अंजीर व गुलाब

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
अंजीर व गुलाब - इसापनीती कथा | Anjir Va Gulab - Isapniti Katha | Isapniti Story
अंजीर व गुलाब

अंजीर व गुलाब - इसापनीती कथा - [Anjir Va Gulab - Isapniti Katha/Isapniti Story]

एके वेळी एका बागेत एक अंजिराचे झाड व एक गुलाब यांजमध्ये परस्परांच्या गुणदोषांबद्दल वाद चालला होता. गुलाब म्हणाला, ‘अहाहा ! अशी सुंदर फुले तुझ्या अंगात येण्याची युक्ती तुला कोणी सांगितली तर तू त्याला वाटेल ते देऊ करशील नाही बरे?’ अंजीर म्हणाला, ‘आणि अशी फळे तुझ्या अंगावर आली तर तू आपला जीवसुद्धा बहाल करशील.’ गुलाब म्हणाला, ‘छी, मला फळे आलेली पाहून लोक हसतील मात्र!’ अंजीर म्हणाला, ‘आणि मला फुले आली तर मलासुद्धा लोक हसतील; शिवाय फुलांपेक्षा फळे अधिक उपयोगी आहेत हे कोणीही सांगेल.’

तात्पर्य: परमेश्वराने जे आपणास दिले त्यातच संतुष्ट रहावे हे योग्य आहे.