आंब्याचे झाड आणि भोपळीचा वेल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
आंब्याचे झाड आणि भोपळीचा वेल - इसापनीती कथा | Ambyache Jhad Aani Bhoplicha vel - Isapniti Katha | Isapniti Story
आंब्याचे झाड आणि भोपळीचा वेल

आंब्याचे झाड आणि भोपळीचा वेल - इसापनीती कथा - [Ambyache Jhad Aani Bhoplicha vel - Isapniti Katha/Isapniti Story]

एका आंब्याच्या झाडाच्या तळाजवळ एक भोपळीचा वेल लावला होता. वेल अगदी हंगामी लावला गेल्यामुळे झपाटयाने वाढला व आंब्याच्या झाडावर चढून त्याने बराच मोठा भाग व्यापला. पुढे त्यास फुले व फळे येऊ लागली तेव्हा आंब्याचे झाड रिकामे पाहून तो आब्यांला म्हणाला, ‘काय रे दादा, मी जितक्या दिवसात वाढलो त्याहून अधिक वर्षे तुला वाढायला लागली,’ असे म्हणून तो तुच्छतादर्शक मुद्रेने आंब्याकडे पाहू लागला. आंब्याने त्याला उत्तर दिले, ‘अरे तू फार झपाटयाने वाढलास व मला वाढावयास अधिक काळ लागला हे खरे; परंतु कित्येक हिवाळे व पावसाळे मजवरून गेले तरी मी जशाचा तसाच आहे, परंतु थंडीने थोडीशी चमक दाखवली तर तुला मात्र आपला गर्व फळे आणि फुले यांसह सोडावा लागला.

तात्पर्य: लवकर प्रगती होणे हे नेहमी वाखाणण्याजोगे असते असे नाही.