झाड आणि कुऱ्हाडीचा दांडा
Isapniti Katha
एक लाकूडतोडया रानातले एक मोठे झाड कुऱ्हाडीने तोडत होता. त्यामुळे त्या झाडास फार वेदना होऊ लागल्या. तेव्हा ते झाड आपल्याशीच म्हाणाले, ‘काय माझी वाईट स्थिती झाली ही! ज्या कुऱ्हाडीने हा मनुष्य मला तोडत आहे तिचा किंवा या मनुष्याचा यात काही मोठासा दोष आहे असे नाही, परंतु माझ्याच शरिरापासून काढलेल्या या कुऱ्हाडीच्या दांडयाने मला तोडण्यास या कुऱ्हाडीस मदत करावी, हे पाहून मला फार वाईट वाटते.’
तात्पर्य:- मनुष्यावर संकट येणे हे तर वाईटच, परंतु ते संकट त्याच मनुष्याच्या आप्तांनी त्याजवर आणावे, यासारखी दुःखदायक गोष्ट दुसरी नाही.
इसापनीती कथा भाग १
- गरुड आणि घुबड
- सिंह आणि गाढव
- कोल्हा, रानमांजर आणि ससा
- गाढव आणि त्याचा निर्दय धनी
- रानडुक्कर आणि गाढव
- उंदीर आणि चिचुंद्री
- झाड आणि कुऱ्हाडीचा दांडा
- गाढव, माकड आणि चिचुंद्री
- डुकरी आणि लांडगा
- कावळा आणि कालव
- पशु, पक्षी आणि शहामृग
- घोडा आणि रानडुक्कर
- शेळी, करडू आणि लांडगा
- खाटीक आणि कुत्रा
- पोपट आणि चिमणी
- शेळी आणि कावळा
- गाढव आणि लांडगा
- शेतकरी आणि बकरे
- रानमांजर आणि वाघूळ
- दोघे मुलगे आणि दुकानदार
- करडू, बोकड आणि लांडगा
- उंटाचे प्रथमदर्शन
- म्हातारे मांजर आणि उंदीर
- कोल्हा आणि कोंबडा
- जुने झाड लपटून पुनः लावले !
- मोलकरीण आणि कोंबडी
- पारधी आणि पारवा
- लहान मासा आणि मोठा मासा
- कोल्हा आणि वानर
- कुत्रा आणि लांडगा
- तारवावरील दोन प्रवासी
- दोन कोंबडे
- भविष्यवादी
- चतुर स्त्रा
- प्रवासी आणि ज्योतिषी
- कवडा आणि कोंबडे
- कोल्ही आणि सिंहीण
- धनगर व्यापारी झाला होता
- देव आणि नास्तिक मनुष्य
- वैद्य आणि रोगी
- निराश झालेले कोळी
- मनुष्य आणि त्याचा लाकडी देव
- गरुड पक्षी आणि मनुष्य
- शेतकरी आणि त्याचे मुलगे
- खंडोबा आणि मधमाशी
- लोहर आणि त्याचा कुत्रा
- लांडगा आणि सिंह
- सिंह आणि बैल
- गप्पीदास
- खंडोबा आणि प्रवासी





