माझा बालमित्र | Majha Balmitra

इसापनीती कथा | Isapniti Katha

रानडुक्कर आणि गाढव

Majha Balmitraएक रानडुक्कर आणि एक गाढव यांची एके दिवशी बरीच बोलाचाली झाली. वाढता वाढता ते भांडण हातघाईवर आले. आपणास सुळे असून, आपले डोके गाढवाच्या डोक्यापेक्षां मोठे आहे, तेव्हा गाढवास आपण सहज चीत करू अशा समजुतीने डुक्कर गाढवावर चालून गेला.

इतका वेळ गाढवाचे तोंड डुकराकडे होते, पण डुकराच्या तिखट सुळ्यांपुढे आपला निभाव लागणार नाही, असे पाहून गाढवाने आपले ढुंगण डुकराकडे केले व त्याच्या तोंडावर लाथा मारण्याचा सपाटा चालविला. डुकराची अगदी गाळण उडाली!

त्यावेळी तो गाढवास म्हणतो, ‘अरे, हे काही धर्मयुद्ध नव्हे. टक्कर दयावयाची सोडून तू लाथा मारशील अशी मला कल्पनाही नव्हती!’

तात्पर्य :- स्वतःच्या सामर्थ्यावर वाजवीपेक्षा अधिक विश्वास ठेवणे बरे नव्हे.

इसापनीती कथा भाग १

 

  • मोलकरीण आणि कोंबडी
  • पारधी आणि पारवा
  • लहान मासा आणि मोठा मासा
  • कोल्हा आणि वानर
  • कुत्रा आणि लांडगा
  • तारवावरील दोन प्रवासी
  • दोन कोंबडे
  • भविष्यवादी
  • चतुर स्त्रा
  • प्रवासी आणि ज्योतिषी
  • कवडा आणि कोंबडे
  • कोल्ही आणि सिंहीण
  • धनगर व्यापारी झाला होता
  • देव आणि नास्तिक मनुष्य
  • वैद्य आणि रोगी
  • निराश झालेले कोळी
  • मनुष्य आणि त्याचा लाकडी देव
  • गरुड पक्षी आणि मनुष्य
  • शेतकरी आणि त्याचे मुलगे
  • खंडोबा आणि मधमाशी
  • लोहर आणि त्याचा कुत्रा
  • लांडगा आणि सिंह
  • सिंह आणि बैल
  • गप्पीदास
  • खंडोबा आणि प्रवासी
MarathiMati.com - Android App on Google Play Store


मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer