माझा बालमित्र | Majha Balmitra

इसापनीती कथा | Isapniti Katha

गाढव आणि त्याचा निर्दय धनी

Majha Balmitra एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे. अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला. रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला, ‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’

तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.

इसापनीती कथा भाग १

 

  • मोलकरीण आणि कोंबडी
  • पारधी आणि पारवा
  • लहान मासा आणि मोठा मासा
  • कोल्हा आणि वानर
  • कुत्रा आणि लांडगा
  • तारवावरील दोन प्रवासी
  • दोन कोंबडे
  • भविष्यवादी
  • चतुर स्त्रा
  • प्रवासी आणि ज्योतिषी
  • कवडा आणि कोंबडे
  • कोल्ही आणि सिंहीण
  • धनगर व्यापारी झाला होता
  • देव आणि नास्तिक मनुष्य
  • वैद्य आणि रोगी
  • निराश झालेले कोळी
  • मनुष्य आणि त्याचा लाकडी देव
  • गरुड पक्षी आणि मनुष्य
  • शेतकरी आणि त्याचे मुलगे
  • खंडोबा आणि मधमाशी
  • लोहर आणि त्याचा कुत्रा
  • लांडगा आणि सिंह
  • सिंह आणि बैल
  • गप्पीदास
  • खंडोबा आणि प्रवासी

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.