चातुर्य कथा

चातुर्य कथा | Chaturya Katha

चातुर्य कथा - [Chaturya Katha] बालमित्रांसाठी मराठी चातुर्य कथा.

शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ।
अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥समर्थ रामदास स्वामी

सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा, या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे. भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे. परंतु ‘चातुर्य’ म्हणजे काय, हे ठाऊक आहे? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा, मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन. माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला तर आपण या प्रसंगात का सापडलो याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत न बसता आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतो, थोडक्यात सांगायचं तर, विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर चातुर्य हे कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष कृती करुन दाखविणारे असते.

जोश बिलिंग्ज नावाचा पाश्चात्य विचारवंत म्हणतो..

“विद्वत्ता ही ग्रंथालयांतून झोपा काढत व घोरत असते, तर चातुर्य हे संभाव्य प्रसंगाला तोंड देण्यासाठी अगदी जागरुकतेनं एका पायावर उभे असते.”

अंगी चातुर्य नसलेली माणसं भोवताली कितीही असली, तरी एकटा चतुर माणूस त्या सर्वांवर मात करु शकतो. आगऱ्यास औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवप्रभुंनी फुलादखानाच्या पहाऱ्यातून आपल्या पुत्रासह पलायन केले, ते चातुर्याच्या जोरावरच ना ? म्हणून “समर्थ रामदास स्वामी” म्हणतात..

उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तचि आळिले ।
धूर्तापासी काही न चाले । बाजाऱ्यांचे ॥समर्थ रामदास स्वामी

भावार्थ: बाजारबुणगे जरी संख्येनं बरेच असले, तरी धूर्त म्हणजे चतूर माणूस त्यांना ताब्यात ठेवतो. धूर्तापुढे त्या अलबत्या गलबत्त्यांचे काहीएक चालत नाही.

ओवाळणी - चातुर्य कथा | Ovalani - Chaturya Katha

ओवाळणी

चातुर्य कथा

एका गृहस्थाला दोन मुले होते, एकाचं लग्न झालं होतं तर दुसऱ्याच व्हायचं होत. मृत्यूसमय जवळ येताच आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, ‘ तुमच्यासाठी मी बरीच शेतीवाडी ठेवली आहे; मोठा वाडाही आहे, शिवाय तुम्हा दोघांनाही चांगल्या नोकऱ्या आहेत, तेव्हा एकीनं व प्रेमानं वागा.

अधिक वाचा

चतूर चिंतामणी - चातुर्य कथा | Chatur Chintamani - Chaturya Katha

चतूर चिंतामणी

चातुर्य कथा

कर्ज करुन ठेवणारा पिता हा जरी शत्रु असला, तरी मंत्री मात्र तसा ठरत नाही. कारण पित्याने केलेले कर्ज मुलाच्या दु:खाला कारणीभूत असते. राष्ट्रांच्या बाबतीत मात्र ते त्यांच्या हितासाठी केलेले असते.

अधिक वाचा

पुढ्यात पैसे नाही ठेवले - चातुर्य कथा | Pudhyat Paise Nahi Thevale - Chaturya Katha

पुढ्यात पैसे नाही ठेवले

चातुर्य कथा

‘माझ्या दर्शनानं काहीतरी मिळाल्यासारखं तुम्हाला वाटतयं, तुमच्या भेटीनं मलाही काहीतरी नको का वाटायला ?’

अधिक वाचा

मेले कोण - नेले कुणाला - चातुर्य कथा | Mele Kon Nele Kunala - Chaturya Katha

मेले कोण - नेले कुणाला

चातुर्य कथा

इंग्रज राज्यकर्त्यांविरुध्द महात्मा गांधीनी सुरु केलेली सन १९४२ ची ‘छोडे भारत’ चळवळ ऎन जोमात होती.

अधिक वाचा

CHATURYA KATHA NAME

चातुर्य कथा

Chaturya katha text

अधिक वाचा