NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

अग्रपूजा

Chaturya Katha - Agrapuja

यज्ञ, विवाह, इत्यादी धार्मिक विधींचे वेळी पूअग्रपूजेचा-म्हणजे प्रथम -पूजेचा मान कोणत्या देवाला द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटू लागले.अखेर हा तंटा ब्रम्हदेवाकडे गेला असता, ते म्हणाले, 'आपण कुणाही एका देवाला अग्रपूजेचा मान दिला, तर इतर देव नाराज होतील. तेव्हा हा निर्णय कसा घ्यावा, याचा मी एक मार्ग सुचवतो. जो देव या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर माझ्याकडे येईल, त्याला हा अग्रपूजेचा मान बहाल केला जावा.'सर्वच देवांना हा तोडगा मान्य करावा लागला.

मग प्रत्येकजण आपापल्या वाहनावर स्वार होऊन, पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला. कुणी वाघावर, कुणी गरुडावर तर कुणी मोरावर !श्री गणपतीनं विचार केला 'आपलं वाहन उंदीर ! एकतर त्यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणं अशक्य आणि दुसरं म्हणजे ते शक्य झालंच, तरी या स्पर्धेत विजयी होणं हे त्याहूनही अशक्य !'हा विचार मनात येताच त्याला एक युक्ती सुचली.

त्याबरोबर तो घरी गेला व पार्वतीला म्हणाला, 'आई, तू थोडा वेळ बाबांजवळ जाऊन बसतेस का ?'पार्वती म्हणाली, ' ही रे काय थट्टा आरंभलीस?'यावर गणपती म्हणाला, ' आई ! वडिलाधाऱ्यांचं लहानांनी ऎकावं, पण वडिलधाऱ्यांनी मात्र लहानांच ऎकू नये असा काही नियम आहे का? मी काही तुझी थट्टा करण्याच्या हेतूनं तुला बाबांजवळ बसायला सांगत नाही. तसं सांगण्यामागे माझा काही हेतू आहे.'गणपतीचे हे उदगार ऎकून भगवान शंकर म्हणाले, पार्वती, गणपती म्हणतो आहे ते खरं आहे. तो कारण असेल तेव्हाच बोलतो व योग्य असेल तीच कृती करतो. तो सांगतोय तर येऊन बैस ना तू माझ्याजवळ?'

पार्वती शंकराजवळ जाऊन बसताच, गणपतीनं त्या दोघांना सात पृथ्वीप्रदक्षिणेला निघून गेले असता, हा स्थूलदेही गणपती ती प्रदक्षिणा पूर्ण करुन एवढ्या लवकर कसा परत आला, असा ब्रम्हदेवांना प्रश्न पडला, पण गणपतीनं आपण योजलेल्या युक्तीची माहिती देताच ब्रम्हदेवांना त्यांच म्हणणं मान्य करावं लागलं.त्यानंतर कमी अधिक कालांतरानं इतर सर्व देव पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करुन ब्रम्हदेवांकडे परत आले व विजयी स्पर्धक कोण, याबद्दलच्या निकालाची उत्कंठेनं वाट पाहू लागले.

तोच ब्रम्हदेव सर्वांपूढे उभे राहून म्हणाले, 'आई ही पृथ्वीस्वरुप असून, वडील नारायणस्वरुप आहेत. त्यामुळे त्यांना घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही श्रेष्ठ आहे. महाबुध्दीवान गणपतीनं त्याच्या आई-वडिलांना एकच नव्हे, तर सात प्रदक्षिणा घातल्या व तो सर्वांच्या आधी मजकडे आला; म्हणून अग्रपूजेचा अधिकारी तो असल्याचा निर्णय मी देत आहे.'


Book Home in Konkan