NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store

त्यांचा त्रास तू असा चुकव

Chaturya Katha - Tyancha Tras Tu Asa Chukav

गुरुगृही अध्ययन करुन घरी गेलेला एक शिष्य एकदा गुरुंकडे आला व त्यांना म्हणाला, 'गुरुदेव ! मला रिकामटेकडया आप्तमित्रांचा अतिशय त्रास होतो. ते कोणत्याही कामाशिवाय वारंवार माझ्या घरी येतात; तास्‌नतास इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा मारतात, आणि नुसता माझा वेळच घेतात असं नाही, तर माझ्या वाचनात व चिंतनाही व्यत्यय आणतात. त्यांचा हा त्रास मी कसा टाळू?'

गुरु म्हणाले, 'वत्सा ! तुझ्याकडे जे तुझे श्रीमंत आप्तमित्र येतील, त्यांच्याकडे तू पैसे उसने मागू लाग. असे केलेस म्हणजे तुला पैसे उसने द्यावे लागू नयेत, म्हणून ते तुझ्याकडे यायचे आपोआप बंद होतील.'

शिष्य म्हणाला, 'गुरुदेव ! ही युक्ती मोठी नामी सांगितलीत, पण तरीही मला माझ्या गरीब आप्तमित्रांचा त्रास होतच राहील, तो कसा चुकवू ?'गुरु म्हणाले, 'त्या गरीब आप्तमित्रांनी तुझ्याकडे उसने म्हणून पैसे मागितले की तू ते बेशक देत जा. म्हणजे घेतलेले पैसे बुडविता यावेत, या हेतूनं तेही तुझ्याकडे यायचे बंद होतील.'