सुविचार

Suvichar | Marathi Good Thoughts

आजचा सुविचार : डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

विचारधन | Vichardhan | Quotes

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.

आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...

पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.

कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !

सुरुवात कशी झाली यावर बर्‍याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

- मराठीमाती सुविचार कोष

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

- मराठीमाती सुविचार कोष

प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान

- मराठीमाती सुविचार कोष

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

- मराठीमाती सुविचार कोष

यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

- मराठीमाती सुविचार कोष

प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

- मराठीमाती सुविचार कोष

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

- मराठीमाती सुविचार कोष

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

- मराठीमाती सुविचार कोष

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

- मराठीमाती सुविचार कोष

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

- मराठीमाती सुविचार कोष

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

- मराठीमाती सुविचार कोष

छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

- मराठीमाती सुविचार कोष

आपण जे पेरतो तेच उगवतं.

- मराठीमाती सुविचार कोष

फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

- मराठीमाती सुविचार कोष

उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.

- मराठीमाती सुविचार कोष

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

- मराठीमाती सुविचार कोष

प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.

- मराठीमाती सुविचार कोष

आधी विचार करा; मग कृती करा.

- मराठीमाती सुविचार कोष

आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,

- मराठीमाती सुविचार कोष

फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसर्‍यांसाठी जगलास तर जगलास !

- मराठीमाती सुविचार कोष

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

- मराठीमाती सुविचार कोष

अतिथी देवो भव ॥

- मराठीमाती सुविचार कोष

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

- मराठीमाती सुविचार कोष

दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

- मराठीमाती सुविचार कोष

आपल्यामुळे दुसर्‍याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

- मराठीमाती सुविचार कोष