सुविचार कोष भाग - ९
Suvichar | Marathi Good Thoughts
टीका करणार्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणार्या मित्रांपासून सावध रहा.
- मराठीमाती सुविचार कोष
प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
- मराठीमाती सुविचार कोष
मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
- मराठीमाती सुविचार कोष
भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
- मराठीमाती सुविचार कोष
वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
- मराठीमाती सुविचार कोष
त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
- मराठीमाती सुविचार कोष
शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
- मराठीमाती सुविचार कोष
कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
- मराठीमाती सुविचार कोष
बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
- मराठीमाती सुविचार कोष
दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
- मराठीमाती सुविचार कोष
ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
- मराठीमाती सुविचार कोष
दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
- मराठीमाती सुविचार कोष
जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
- मराठीमाती सुविचार कोष
एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
- मराठीमाती सुविचार कोष
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
- मराठीमाती सुविचार कोष
श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
- मराठीमाती सुविचार कोष
राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
- मराठीमाती सुविचार कोष
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
- मराठीमाती सुविचार कोष
असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
- मराठीमाती सुविचार कोष
उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
- मराठीमाती सुविचार कोष
ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
- मराठीमाती सुविचार कोष
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
- मराठीमाती सुविचार कोष
पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
- मराठीमाती सुविचार कोष
मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
- मराठीमाती सुविचार कोष
दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
- मराठीमाती सुविचार कोष







