सुविचार कोष भाग - ६
Suvichar | Marathi Good Thoughts
स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
- मराठीमाती सुविचार कोष
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
- मराठीमाती सुविचार कोष
माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
- मराठीमाती सुविचार कोष
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
- मराठीमाती सुविचार कोष
तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
- मराठीमाती सुविचार कोष
शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
- मराठीमाती सुविचार कोष
हसा, खेळा पण शिस्त पाळा.
- मराठीमाती सुविचार कोष
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
- मराठीमाती सुविचार कोष
स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
- मराठीमाती सुविचार कोष
तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
- मराठीमाती सुविचार कोष
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
- मराठीमाती सुविचार कोष
काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
- मराठीमाती सुविचार कोष
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
- मराठीमाती सुविचार कोष
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
- मराठीमाती सुविचार कोष
उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
- मराठीमाती सुविचार कोष
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
- मराठीमाती सुविचार कोष
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !
- मराठीमाती सुविचार कोष
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
- मराठीमाती सुविचार कोष
दुसर्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
- मराठीमाती सुविचार कोष
माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
- मराठीमाती सुविचार कोष
प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
- मराठीमाती सुविचार कोष
व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
- मराठीमाती सुविचार कोष
काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
- मराठीमाती सुविचार कोष
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
- मराठीमाती सुविचार कोष
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
- मराठीमाती सुविचार कोष







