सुविचार कोष भाग - ४
Suvichar | Marathi Good Thoughts
सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
- मराठीमाती सुविचार कोष
सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
- मराठीमाती सुविचार कोष
शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
- मराठीमाती सुविचार कोष
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
- मराठीमाती सुविचार कोष
विद्या विनयेन शोभते ॥
- मराठीमाती सुविचार कोष
शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.
- मराठीमाती सुविचार कोष
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
- मराठीमाती सुविचार कोष
एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
- मराठीमाती सुविचार कोष
कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
- मराठीमाती सुविचार कोष
आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.
- मराठीमाती सुविचार कोष
ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
- मराठीमाती सुविचार कोष
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
- मराठीमाती सुविचार कोष
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
- मराठीमाती सुविचार कोष
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
- मराठीमाती सुविचार कोष
मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
- मराठीमाती सुविचार कोष
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
- मराठीमाती सुविचार कोष
जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
- मराठीमाती सुविचार कोष
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
- मराठीमाती सुविचार कोष
रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
- मराठीमाती सुविचार कोष
जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
- मराठीमाती सुविचार कोष
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
- मराठीमाती सुविचार कोष
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
- मराठीमाती सुविचार कोष
जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
- मराठीमाती सुविचार कोष
पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
- मराठीमाती सुविचार कोष
आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
- मराठीमाती सुविचार कोष







