सुविचार कोष भाग - ३
Suvichar | Marathi Good Thoughts
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
- मराठीमाती सुविचार कोष
मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
- मराठीमाती सुविचार कोष
आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
- मराठीमाती सुविचार कोष
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
- मराठीमाती सुविचार कोष
प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
- मराठीमाती सुविचार कोष
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
- मराठीमाती सुविचार कोष
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
- मराठीमाती सुविचार कोष
काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
- मराठीमाती सुविचार कोष
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
- मराठीमाती सुविचार कोष
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
- मराठीमाती सुविचार कोष
तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
- मराठीमाती सुविचार कोष
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
- मराठीमाती सुविचार कोष
चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
- मराठीमाती सुविचार कोष
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
- मराठीमाती सुविचार कोष
उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
- मराठीमाती सुविचार कोष
पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
- मराठीमाती सुविचार कोष
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
- मराठीमाती सुविचार कोष
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
- मराठीमाती सुविचार कोष
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
- मराठीमाती सुविचार कोष
अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
- मराठीमाती सुविचार कोष
अंथरूण बघून पाय पसरा.
- मराठीमाती सुविचार कोष
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
- मराठीमाती सुविचार कोष
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
- मराठीमाती सुविचार कोष
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
- मराठीमाती सुविचार कोष
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
- मराठीमाती सुविचार कोष







