| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | |||
![]() |
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ६०१) क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल. ६०२) ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चात्रित्र्य निर्माण करणे हेच असले पाहिजे. ६०३) आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. ६०४) प्रवासावरुन केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी. ६०५) जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते. पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे. दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे. ६०६) दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावे या आनंदासारखा दुसरा आनंद नाही. ६०७) काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो. ६०८) जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही. ६०९) असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते. ६१०) वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. ६११) स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा. त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या. ६१२) 'स्व' चा शोध घेण्यास 'स्व' बद्दलचे सत्य मत लागते. ६१३) तुमची प्रतिष्ठा जेवढी मोठी तेवढीच तुमची बदनामी जास्त. ६१४) पापी माणसाला पाप कधीही शांतपणे झोपू देत नाही ६१५) सुधारणा ही बाहेरुन लादता येत नाही, तिचा उगम आतूनच पाहिजे. भीती घालून कुणालाही सदगुणी बनवता येत नाही. ६१६) अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो. ६१७) गैरसमज कधीही मनात ठेवू नये. त्याचे निराकरण करावे. ६१८) ज्याच्याजवळ पैशाशिवाय दुसरे काहीच नाही तो सर्वात गरीब! ६१९) जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते, तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ठ होत नाही. जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते, तेव्हा त्याचे काहीतरी नष्ठ होते. परंतु, जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते. ६२०) एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे. ६२१) कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते. ६२२) परिश्रमाशिवाय प्रारब्ध्द पांगळे असते. ६२३) देशातीत्ल प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत स्वत:च्या कर्तव्याची जाणीव होत नाही किंवा ती जाणीव होऊनही त्यानुसार वागावेसे वाटत नाही, तोपर्यंत त्या देशाचा उध्दार होणे कठीण असते. ६२४) तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते. ६२५) जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही.
१२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८ |