| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | ||
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ५२६) कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. ५२७) कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे. ५२८) कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. ५२९) कोमलता हा ह्रदयाचा धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म. देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि ह्रदयाला फ़ुलापेक्षाही अधिक कोमल बनवा. ५३०) खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. ५३१) खर्च करुन आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा. ५३२) घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा. ५३३) गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका. ५३४) घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. ५३५) घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाडमयाचे कार्य आहे. ५३६) चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. ५३७) छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते. ५३८) चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. ५३९) जे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते. ५४०) ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. ५४१) जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ? ५४२) ज्याची कृती सुंदर तो सुंदर ! ५४३) जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. ५४४) ज्योतीचं म्हत्त्व, पावित्र्य अंधारात चाचपडणाऱ्यांनाच कळंत. ५४५) जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! ५४६) जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्याला दु:ख का येतं ? कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती, क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून ! ५४७) ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक ! ५४८) झऱ्याचे रुपांतर नदीत होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात. वाईट सवयींचेही असेच होते. ५४९) जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. ५५०) ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली. १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पूढे नेणारी एक अस्सल मराठमोळी वेबसाईट 2001 - 2013 |