| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | ||
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ५०१) मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का ! ५०२) बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य ! ५०३) मृत्यू म्हणजे दु:ख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही. ५०४) आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप ! ५०५) ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. ५०६) आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात. ५०७) आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका. ५०८) आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु. ५०९) अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. ५१०) आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते. ५११) आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते. ५१२) आशा ही उत्साहाची जननी आहे. ५१३) अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. ५१४) आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात. ५१५) आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दु:खात होतो. ५१६) आशा हीच जीवनाची सर्वात मोठी शक्ती असते ! ५१७) अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. ५१८) अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. ५१९) आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे. ५२०) आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. ५२१) असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. ५२२) असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगूर असतो. ५२३) इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे. ५२४) उद्योगी माणूस कधीच निर्धनम नसतो. ५२५) कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो. १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पूढे नेणारी एक अस्सल मराठमोळी वेबसाईट 2001 - 2013 |