| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | ||
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ४७६) गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो. ४७७) गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच. ४७८) ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. ४७९) लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही. ४८०) दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. ४८१) सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चागंले. ४८२) प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी किनार असते. ४८३) नियम अगदी थोडा असावा पण तो प्राणापलिकडे जपावा. ४८४) शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. ४८५) सदगुणांवर हल्ला केला तरी त्याला इजा होत नाहीत. ४८६) मानापमानाच्या पलिकडे जगणं शिका. ४८७) माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे तेच माझे म्हणा. ४८८) जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात. ४८९) सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड. ४९०) माणंसाकरिता धर्म आहे, धर्माकरिता माणसे नाहीत हे लक्षात घ्या. ४९१) जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे. ४९२) माणसाने माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशूत होते. ४९३) कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो. ४९४) प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो. ४९५) केल्याविण सांगो नये आपला पराक्रम ॥ ४९६) विचार बदला; आयुष्य बदलेल. ४९७) ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं. ४९८) एकच नियम पाळा - कोणताही नियम तोडू नका. ४९९) ज्याला काय लिहावं यापेक्षा काय लिहू नये हे कळतं तोच खरा लेखक ! ५००) सत (चागंले) कडे नेते ते सत्य. १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पूढे नेणारी एक अस्सल मराठमोळी वेबसाईट 2001 - 2013 |