| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | ||
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ३७६) समाज म्हणजे लोकांचा जमाव नव्हे, एकी होय . ३७७) कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा; भक्ती म्हणजे सेवाभाव . ३७८) बिनभिंतीची इथली शाळी, लाखो इथले गुरु । झाडे, वेली, पशुपाखरे यांची संगत धरु ॥ ३७९) आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो . ३८०) आरोग्य हाच सर्वोतम लाभ, तृप्ती हेच खरे धन ,विश्वसनीय मित्र हेच सर्व सर्वोत्कृष्ट नातेवाईक आणि निर्मिती हाच परमानंद आहे . ३८१) जीवनाचे सोने होईल अशी खटपट करा . ३८२) वैराने वैर वाढेल, परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका . ३८३) पायदळी चुरगळलेली फ़ुले चुरगळणाऱ्या पायाला आपला सुगंध अर्पण करतात . खऱ्या क्षमेचेही कार्य हेच आहे . ३८४) आवड असली की सवड आपोआप मिळते . ३८५) जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते . ३८६) स्तुतीने चांगली माणसे सुधारतात, तर वाईट माणसे बिघडतात . ३८७) अंथरूण बघून पाय पसरावेत. ३८८) आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फ़ुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या. ३८९) मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात हा प्राथेनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा आधिक उपयुक्त असतो. ३९०) चिंतेऐवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. ३९१) प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते. ३९२) गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उतम ! ३९३) तासभराचे ध्यान हे वर्षभर केलेल्या पूजेअर्चेहून श्रेष्ठ आहे. ३९४) उच्चरावरुन विद्वत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते. ३९५) एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं . ३९६) अधर्म , अनीती , अनाचार यांच्या साहाय्याने मिळविलेला जय पराजयापेक्षाही आधिक लांच्छनास्पद आहे. ३९७) शत्रुशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे. ३९८) स्वार्थरहीत सेवा हीच ख्ररी प्रार्थना. ३९९) लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. ४००) सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात: म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते. १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पूढे नेणारी एक अस्सल मराठमोळी वेबसाईट 2001 - 2013 |