| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | ||
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ३०१) निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो. ३०२) खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा. ३०३) क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. ३०४) जशी दृष्टी तशी सृष्टी. ३०५) श्रवण, भाषण, वाचन, निरीक्षण आणि लेखन एवढे दुर्मीळ अलंकार परमेश्वराने दिले असताना इतर आभूषणांची गरजच काय ? ३०६) प्रेम लाभे प्रेमळांना, त्याग ही त्याची कसोटी. ३०७) सत्तेपूढे शहाणपण चालत नाही. ३०८) लक्ष्मी सत्पुरूषाच्या घरी त्याच्या गृहिणीच्या स्वरूपात नांदत असते. ३०९) जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ॥ ३१०) चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असते, म्हणून आहेत त्या परंपरा मोडू नका. ३११) निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे. ३१२) माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते. ३१३) कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते. ३१४) आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो. ३१५) सत्कृत्यांची वर्णने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात. ३१६) बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका. ३१७) संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. ३१८) हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे, अहिंसा हे सबलांचे. ३१९) परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं. ३२०) शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही. ३२१) कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो. ३२२) प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. ३२३) मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ ! ३२४) ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते. ३२५) अतिपरिचयाने अवाज्ञा होते. १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पूढे नेणारी एक अस्सल मराठमोळी वेबसाईट 2001 - 2013 |