सुविचार कोष भाग - १०

Suvichar | Marathi Good Thoughts

आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?

- मराठीमाती सुविचार कोष

जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.

- मराठीमाती सुविचार कोष

पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.

- मराठीमाती सुविचार कोष

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

- मराठीमाती सुविचार कोष

अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.

- मराठीमाती सुविचार कोष

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

- मराठीमाती सुविचार कोष

नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.

- मराठीमाती सुविचार कोष

अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.

- मराठीमाती सुविचार कोष

सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.

- मराठीमाती सुविचार कोष

शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.

- मराठीमाती सुविचार कोष

गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.

- मराठीमाती सुविचार कोष

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

- मराठीमाती सुविचार कोष

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.

- मराठीमाती सुविचार कोष

पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !

- मराठीमाती सुविचार कोष

स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.

- मराठीमाती सुविचार कोष

अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.

- मराठीमाती सुविचार कोष

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.

- मराठीमाती सुविचार कोष

स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.

- मराठीमाती सुविचार कोष

अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

- मराठीमाती सुविचार कोष

क्रोध माणसाला पशू बनवतो.

- मराठीमाती सुविचार कोष

आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

- मराठीमाती सुविचार कोष

आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

- मराठीमाती सुविचार कोष

जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !

- मराठीमाती सुविचार कोष

कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

- मराठीमाती सुविचार कोष

परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.

- मराठीमाती सुविचार कोष