|
|
तुमची भांडी मेली की हो
मिथीला नगरीतील एक चतूर नागरीक अशी ख्याती असलेला याचा एक शेजारी कमालीचा लोभी होता. घरचा अतिशय श्रीमंत असूनदेखील तो कुणाला कसलीही वस्तू कधी फ़ुकट देत नसे. कूणी कधी एखाद साधं पातेलं जरी त्याच्याकडून कारणपरत्वे नेलं तरी ते परत घेताना ते पातेलं नेणाऱ्याकडून त्या पातेल्याची वापरणावळ म्हणून एखादा प्याला व वाटी तरी तो घेत असे. त्याच्या या लोभी वृत्तीबद्दल त्याला धडा शिकवीण्याच्या हेतूनं गोनून श्राध्दाच्या दिवशी वडे तळण्यासाठी त्याच्याकडून एक मोठी कढई मागून नेली.
कढई नेल्याला दोन दिवस होतात न होतात तोच त्या शेजाऱ्याने गोनूला हाक मारली व विचारले गोनू कढई नेल्याला दोन दिवस झाले. अजून ती परत केली नाहीस ?'
गोनू म्हणाला, 'त्याचं असं दादाजी, परवा श्राध्दानिमित्त तुमच्याकडून नेलेल्या कढईत माझ्या बायकोनं वडे तळले, आणि जेवण आटोपल्यावर गड्यानं इतर भांड्याबरोबर ती कढईही घासून पुसुन भांड्याच्या खोलीत ठेवून दिली. काल सकाळी ती कढई तुम्हाला पोचती करण्यासाठी मी त्या खोलीत गेलो तरी बाळांत होऊन तिला एक छोटीशी कढई झालेली, तेव्हा मी विचार केला की, बाळ बाळांतणीला लगेच उन्हातानांतून तुमच्याकडे पाठविण्याऎवजी दहा दिवस पूर्ण झाल्यावर पोहोचती करावी.
नंतर दोन तीन महीने असेच निघून गेले. अधूनमधून गाठभेट झाली की तो लोभी शेजारी गोनूला आवर्जुन म्हणे कधी भांडी लागली घेऊन जात जा बरं का !'
-आणि एका सणाची संधी साधून गोनू त्या शेजाऱ्याकडे गेला व त्याला म्हणाला दादाजी आज माझ्याकडे पाचपंचवीस पाहुणे जेवायला येणार आहेत; तेव्ह पापड व भजी तळण्यासाठी ती तुमची मोठी कढई देता का?'
गोनूच्या अपेक्षेप्रमाणे तो लोभी शेजारी त्याला म्हणाला, 'अरे गोनू नुसती कढईचीच गोष्त कशाला करतेस पाच पंचवीस पाहूणे येणार तेव्हा नुसत्या कढईन काय भागणार. मी त्या कढईबरोबर दोन मोठी पातेले व दोन पिंपेही देतो. एवढं मात्र लक्षात ठेव या भांड्यातील काही भांडी जर का व्यायली तर त्यांना व त्यांच्या पोरांना माझ्याकडे काळजीपूर्वक परत कर. शेजाऱ्याच्या त्या म्हणण्याला होकार देऊन आणि त्याने दिलेली भांडी गड्याच्या डोक्यावर चढवून गोनू ने ती आपल्या घरी नेली.
दोन चार दिवसांनी गोनू आपल्या घरावरुन अत्यंत दु:खी चेहऱ्याने जात असलेला दिसताच शेजाऱ्याने विचारलं, काय रे गोनू तू असा एकदम दु:खी का दिसतोस ?'
हुंदके देत देत व डोळे पुसत पुसत गोनू म्हणाला, 'दादाजी काय सांगू आणि कसं सांगू ? कसली साथ आली देव जाणे पण तुम्ही दिलेली सगळीच्या सगळी भांडी त्या साथीत तडकाफ़डकी मरुन गेली. या वयात तुम्हाला धक्का बसेल, म्हणून मेलेली भांडी तुम्हाला न दाखवता परस्पर स्मशानात नेऊन मी जाळून टाकली.'
शेजारी आता भांडू लागला व भांडी परत न केल्यास न्यायालयात जाण्याची धमकी देऊ लागला. पण गोनूसुध्दा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. तो त्याला दाद देईना.
अखेर शेजाऱ्याने ते प्रकरण न्यायालयातं नेल. दोन्ही बाजूचे म्हणणे ऎकून न्यायमुर्ती गोणूच्या शेजाऱ्याला म्हणाले, 'हे पहा दादाजी कढई व्यायली व तिने छोट्या कढईला जन्म दिला हे गोनूचं म्हणणं मान्य करुन त्यानं नेलेल्या तुमच्या कढई संगे तिला झालेली मुलगी म्हणून त्यानं दिलेल्या दुसऱ्या कढईचा तुम्ही स्विकार केलात नां?' मग आता तुम्ही दिलेली भांडी साथीत मेली, ' हे त्याच म्हणणही तुम्ही मान्य केलं पाहिजे, कारण जी भांडी बाळांत होऊ शकतात ती मरुही शकतात हे ओघानचं आलं.'
नाईलाजान मनातल्या मनात चरफ़डत तो लोभी शेजारी घरी चालला असता, त्याच्याजवळ जाऊन गोनू म्हणाला, 'दादाजी झालं गेलं विसरुन जा, मी तुमची सगळी भांडी परत देतो. मात्र यापुढे ही लोभी वृत्ती सोडून द्या.'
गोनूने शिकवीलेल्या या धड्यानं त्या लोभी माणसाचं गावात बरचं हसं झालं परंतू त्यामुळे त्याच्यात बरीच सुधारणा झाली.
|
| चातुर्य कथा |
१. लग्नातली देणी-घेणी
२. अग्रपूजा
३. मोहिनी
४. अक्काबाईची आराधना
५. शंकराचं उत्तर
६. पाचशे साक्षीदार
७. हंस कोणाचा ?
८. आई ती आई
९. तर मी तुझा मुलगा उठवीन
१०. तुला हवं, ते त्याला दे
११. तू मला मिठासारखी
१२. तू मला मिठासारखी
१३. भीमटोला
१४. यात माझा काय अपराध ?
१५. त्यांचा त्रास तू असा चुकव
१६. मृत्यूपुर्वीचे मागणे
१७. चतुर सुना
१८. घर लहानच बरे
१९. देवा, तुमचं कसं व्हायचं ?
२०. पांडित्य सत्कारणी लावा
२१. भुताला कामगिरी
२२. ओले हात
२३. समस्या-पूर्ती
२४. डोकेबाज यमदूत
२५. खरी नक्कल
२६. हेही गेले, तेही गेले !
२७. एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही
२८. किती चतूर बायका
२९. अ चा आ, उडवी शत्रुचा धुव्वा
३०. चोरावर मोर
३१. राजा शरमिंधा झाला
३२ चतूर न्यायमुर्ती
३३. हा श्लोक मात्र नवीन आहे.
३४. कालीमातेला कौल
३५. हजरजबाबी कालीदास
३६. अख्खी म्हैस पाच रुपयात
३७. तीन पीडा
३८. आंधळ्याची दूरदृष्टी
३९. माझे दारिद्रय जाळ
४०. चोरा, तुझ्या हाती माझी संपत्ती सुरक्षित होती.
४१. चंद्र चुलीत गेला
४२. हुशार हेमंत
४३. कौतुक अंगाशी आले.
४४. तेवढं काम मीसुध्दा करीन.
४५. गाढवाची सावली
४६. चमच्यांचा चमत्कार !
४७. मग मला कामच कुठं राहिलं ?
४८. बाईसाहेब आल्या.
४९. समुद्र पिण्याची पैज
५०. गुरुजी बोलले आणि सर्वजण लाजले.
५१. मित्राची हजामत
५२. न संपणारी गोष्ट
५३. शिव्या उलटवल्या
५४. पोटदुख्याला प्रतिशह
५५. गोड भांडणाच गोड शेवट
५६. तुमची भांडी मेली की हो
५७. खरी पंडित तूच आहेस.
५८. लाजाळू पाहुणे
५९. जशी स्थिती तुझी, तशीच माझी
६०. मडक्यात भोपळा भर, आणि हुशारी सिध्द कर.
६१. मग राजा गप्प झाला.
६२. दोन अपराधी !
६३. दगडोबावर दावा
६४. अब्रुची जपणूक
६५. मुलाचे पाय पाळण्यात दिसले.
६६. फ़ोडा आणि झोडा
६७. प्राप्तीचा अर्धा वाटा
६८. अजाला भेटला विजा
६९. राजा मारु पाहतो, पण चतूर माणूस त्यावर कडी करतो
७०. राजा वरमला
७१. हत्तींची वाटणी
७२. आता कशाला उगाच पैसे खर्च करतोस
७३. लोण्याचे कर्ज
७४. दुसऱ्यासाठी मागणे
७५. बलदंड चिमणी
७६. वकिलाचा वकील
७७. निरपराधी पाय
७८. कोळशातले रत्न
७९. मेलेला हत्तीच जिवंत हवा
८०. वळणातला वासू.
|
८१. राजगुरु
८२. प्रश्न सामान्य -उत्तरे असामान्य
८३. जशास तसे
८४. मुत्सुद्दी युवती
८५. सवाई अपशकुनी
८६. चप्पल दुरुस्तीचे दुकान
८७. चोराच्या मनात कापूस
८८. क्या बात है
८९. एवढा खर्च दागिन्यांचा, उगाच दुसऱ्यांसाठी करायचा
९०. अशी घडवली फ़ाटाफ़ूट
९१. मी मुका व बहिरा आहे ग
९२. आरंभ तोच, फ़क्त अंत वेगळा
९३. चोर असा सापडला.
९४. मी नोकर खाविंदचा
९५. तर तुमच्या जागी माझे नाव घालीन.
९६. मला अशी गिऱ्हाइके मिळत राहतात
९७. चतूर विक्रेता
९८. बालहट्ट
९९. ज्ञानी व अज्ञानी
१००. मरण असे मिळावे
१०१. ताटापुढली मांजर
१०२. सरळ हिशेब
१०३. माझ्या विषयीचं मत हेरलं
१०४. हिरवा घोडा
१०५. संपातला कचरा असला संपवला
१०६ उंची खिचडी
१०७. श्रेष्ठ कोण ? दैव की कर्तृत्व
१०८. स्पर्श न करता, ही रेषा लहान करता ?
१०९. दुसऱ्यासाठी खड्डा खणला आणि आपण त्यात पडला.
११०. केवळ बयकोचा भाऊ, म्हणून काय त्याला उच्चपदी चढवू ?
१११. मौल्यवान चीज
११२ हिशेब लिहायला भाकऱ्या
११३. अरे, मला सोड
११४. गुप्त संदेश
११५. हा शिवाजी खरा नव्हे
११६. रामाचा राम राम
११७. बैलांमागे नंदीबैल धावले !
११८. अखेर पितळ उघडे पडले.
११९. आगऱ्याहून सुटका
१२०. पैशाने गेला. पण बुद्धीने आला
१२१. गुरु नानकांची नेमबाजी
१२२. तुमचं काम योग्य नाही.
१२३. न्यायालयाबाहेर निकाल
१२४. फ़टफ़जिती
१२५. वादाचा शेवट
१२६. देवाचे आवडते लोक
१२७. जागा छान निवडली
१२८. गाढव मात्र जिवंत आहे.
१२९. वडिलांची परंपरा
१३०. यातली आई कोणती ?
१३१. खरा हिरा
१३२. शाल व श्रीफ़ळ
१३३. यावच्चंद्रदिवाकरौ
१३४. स्वत: डुक्कर बनून बसला
१३५. उच्चांक असा गाठला
१३६. तेव्हापासून तुषार तळेकर ताळ्यावर आला
१३७. युक्तीबाज कार्यवाह
१३८. माझं भाषण मी कसं करु ?
१३९. हा तर सर्व धर्मांचा पाया
१४०. वरचे न्यायालय
१४१. मग त्याचे घरही मोठे झाले
१४२. माझा हेतू वेगळा आहे.
१४३. दैवी शक्तीचा माणूस
१४४. मात्रा अशी लागू पडाली.
१४५. मिठाची मिठ्ठास कामगिरी
१४६. मोरोपंताची समयसूचकता
१४७. वहाणेचा लिलाव !
१४८. मेले कोण ! नेले कुणाला ?
१४९. दर्शन घेतले, मग पुढ्यात पैसे नाही ठेवले.
१५०. चतूर चिंतामणी
१५१. ओवाळणी
|
|