गोड भांडणाच गोड शेवट
एका शेतकऱ्याने आपले शेत दुसऱ्या एका शेतकऱ्याला विकले. ज्याने ते शेत खरेदी केले, त्याने त्या शेताच्या एका कोपऱ्यात विहिरीसाठी खोदाई सुरु केली असता त्याल त्यात सोन्याच्या मोहोरांनी भरलेला एक मोठा हंडा मिळाला.
मोहोराचा हंडा मिळालेला शेतकरी, ज्याच्याकडून त्याने ते शेत विकत घेतले. तेव्हा त्यात आता मला सापडलेल्या मोहोरांच्य हंड्याचा खरा मालक तू असल्याने त्याचा तू स्विकार कर.'
ज्याने ते शेत विकले होते तो म्हणाला, 'हा काय न्याय झाला ? अरे ज्याअर्थी मी तुला शेत विकले त्याअर्थी त्यात जेजे मिळेल वा पिकेल तेते सर्व तुझेच आहे. त्यामुळे तो हंडा घेण्य़ाचा मला अधिकार नाही.'
शेताचा पूर्वीचा मालक हंडा घेत नाहीसे पाहून नवा मालक राजाकडे गेला आणि त्याने त्याच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडले. राजाने शेताच्या जुन्या मालकालाही बोलावून घेतले आणि त्याचेही म्हणणे ऎकून घेतले.
दोघांचेही म्हणणे ऎकून घेतल्यावर, ज्याने ते शेत विकले होते त्याला राजाने विचारले, 'तुला लग्नाची मुलगी आहे का?' यावर त्याने होकारार्थी मान हलविली.
शेताच्या नव्या मालकाला राजाने विचारले, 'त्याच्या मुलीला पती शोभून दिसेल, असा तुला लग्नाचा मुलगा आहे का?' यावर त्यानेही 'हो' म्हटले.
एवढे झाल्यावर राजा म्हणाला, 'माझा निर्णय असा की, ज्याने शेत विकले त्याने तो हंडा घ्यावा नंतर त्याने आपली मुलगी त्याचे शेत खरीदणाऱ्या या शेतकऱ्याच्या मुलास द्यावी. लग्नाचा दोन्ही बाजूंचा सर्व खर्च, सापडलेल्या हंड्यातील काही मोहोरा खर्चून करावा. आणि उरलेल्या मोहोरा स्त्रिधन म्हणून आपल्या मुलीसंगे तिच्या पतीकडे म्हणजे शेताच्या या सध्याच्या मालकाच्या मुलाकडे पाठवाव्यात.'
राजाने दिलेल्या या निर्णयांनी ते दोघेही शेतकरी एकदम खुष झाले.
|