बाईसाहेब आल्या.
इसाप हा झांथस नावाच्या तत्त्वेत्त्याकडे गुलाम म्हणून काम करीत होता तेव्हाची गोष्ट, झांथस हा स्वभावाने अतिशय चांगला होता, पण त्याची बायको भलतीच जहांबाज होती. कडाडून भांडू लागायची आणि कधी कधी माहेरी जाऊन राहायची.
एकदा ती अशीच नवऱ्याशी भांडभांडून त्याच गावात असलेल्या आपल्या माहेरी जाऊन राहिली झांथसने बरेच निरोप पाठवले, पण काहे केल्या ती येईना.
तिला घरी कशी आणावी, या विचारात झांथस पडला असता इसाप त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, 'धनी ! बाईसाहेब घरी येत नाहीत, म्हणून तुम्ही विचारात पडला आहात ना ? तुम्ही दुसरं लग्न करीत असल्याची नुसती हूल उठवा आणि दोन-तीन दुकांनातून कापडचोपड व किराणा मालाच्या खरेदीला सुरुवात करा. बघा काय चमत्कार होतो तो.'
इसापने सुचविलेली युक्ती पटल्यामुळे झांथसने त्याप्रमाणे केले. तो दुसरं लग्न करीत असल्याची बातमी त्याच्या बायकोच्या कानी जाताच ती नुसतीच घरी परतली असं नव्हे, तर पुर्वीच्या मानाने बरीच चांगली वागू लागली.
|