तेवढं काम मीसुध्दा करीन.
एका कारखान्यात एक कामगार नेमायचा आहे, असं कळल्यावरुन एक किरकिळ प्रकृतीचा तरुण त्या कारखान्याच्या मालकाकडे गेला व त्याने आपल्याला त्या जागी नेमण्याबद्दल त्याच्याकडे अर्ज दिला.
त्याचे प्रकृतिमान पाहून व कारखान्यात काम करीत असलेल्या आठ-दहा कामगारांकडे त्याचे लक्ष वेधवून मालक म्हणाला, 'हे बघीतलेस माझ्या कारखान्यातले दहा कामगार ? कसे धष्टपुष्ट आणि सुदृढ आहेत ! त्यांच्या मानानं तुझी प्रकृती अगदीच सामान्य आहे. तेव्हा त्यांच्याएवढे काम तू करु शकशील का?'
यावर त्या तरुणाने एकवार त्या आठ-दहा कामगारांकडे व त्यांच्या काम करण्याच्या पध्दीतकडे दृष्टी टाकली, आणि तो त्या कारखान्याच्या मालकाला म्हणाला, 'मालक ! तुमच्या या छोटया कारखान्यात हे जे आठ-दहा सुदृढ कामगार आहेत, त्यांच्यापैकी प्रत्येकजण जेवढे काम दररोज करु शकेल, तेवढे काम मी खरोखरच करु शकणार नाही; परंतू त्यांच्यापैकी प्रत्येजण प्रत्यक्षात जेवढे काम करतो व त्याने जेवढे केलेले काम तुम्हाला चालू शकते, त्यापेक्षा मात्र मी नक्कीच अधिक काम करु शकेन.'
त्या उमेदवार तरुणाचं हे चातुर्यपुर्ण उत्तर ऎकताच त्या कारखान्याच्या मालकाने त्याला ताबडतोब नोकरीव घेतले.
|