कौतुक अंगाशी आले.
जगज्जेता अलेक्झेंडर हा फ़्रान्समधील पॅरीस या शहरी एका समारंभाला गेला असता, त्या ठिकाणी गरिबांच्या मदतीसाठी स्वयंसेवक व स्वयंसेविका 'थाळ्या' फ़िरवू लागले.
अलेक्झेंडर याच्याकडे पैसे मागण्यासाठी एका देखण्या तरुणीला थाळीसह पाठविण्यात आले.
तिच्याकडे पाहून व तिच्या थाळीत सोन्याची वीस पंचवीस नाणी टाकून अलेक्झेंडर तिला म्हणाला.
'ही नाणी मी तुझे हे सुंदर निळे डोळे आणि सोनेरी रेशमी केस, यांच्याकडे पाहून थाळीत टाकली आहेत बरं का?'
यावर त्या थाळीतली नाणी पटकन पिशवीत ओतून व रिकामी थाळी पुन्हा अलेक्झेंडरपुढे धरुन, ती देखणी असूनही चतूर असलेली तरुणी त्याला म्हणाली, 'महाराज; ही नाणी आपण माझ्याकडे पाहून थाळीत टाकलीत, आता देशातल्या हजारो गोरगरिबांकडे पाहून आपण दर्याद्र अंत:करणाने या थाळीत काहीतरी भरीव रक्कम टाकावी.'
या तरुणीच्या रुपाचं कौतुक करायला गेलो, पण आपण चांगलेच खड्यात पडलो या जाणीवेनं अलेक्झेंडरची स्वारी खजील झाली आणि त्याने सोन्याच्या नाण्यांची आणखी एक मुठ तिच्या थाळीत टाकली.
|