१६.
एक सौदागर घोड्यांच्या बाजारात विकण्यासाठी आपला एक थकलेला म्हातारा घोडा घेऊन आला. त्या घोड्याचा एकंदर `अवतार' पाहून एका माणसानं सौदागराला त्या घोड्याची किंमत विचारली. सौदागराने शंभर रुपये सांगताच तो गृहस्थ म्हणाला, "या मरतुकड्या घोड्याचे शंभर रुपये कोण देईल? तू हा गोडा मला पाच रुपयांना दे."
यावर सौदागर म्हणाला, "बरं, पाच रुपये. बोनीच्या वेळी होत असलेला हा सौदा, मी केवळ पंच्याण्णव रुपयांसाठी कशाला मोडू?"
१७.
"स्वतःला अत्यंत आवश्यक असलेली वस्तूही जो दुसऱ्याला आनंदानं देतो, अशा त्यागी माणसाला सत्पुरुष म्हणतात. तुमच्यापैकी कुणी - स्वतःला अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट दुसऱ्याला आनंदाने द्यायला तयार होईल का?" गुरुजींनी वर्गाला विचारलेला हा प्रश्न कानी पडताच गणु पटकन् उभा राहिला व म्हणाला, "गुरुजी! मी देईन."
मोठ्या कौतुकानं गुरुजी म्हणाले," अरे वाः! या वर्गातला एक तरी मुलगा भविष्यकाळात सत्पुरुष होणार, या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. गणू, खरोखरच तुझं जेवढं कौतुक करावं, तेवढं थोडंच होईल. आता तुला जी अत्यंत आवश्यक आहे, आणि तरीही जी दुसऱ्याला आनंदानं देण्याची तुझ्या मनाची तयारी आहे, अशा एखाद्या गोष्टीचं तू मला नाव सांगतोस का?"
अतिशय उत्साहनं गणूनं उत्तर दिलं, "एरंडेल."
१८.
छोट्या राघूनं विचारलं, "आई, माझी किंमत किती आहे गं?
आई- बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे.
राघू - मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपया देतेस का?
१९.
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
पत्नी - कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?
गोपाळराव - तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
२०.
दोघे मुंबईकर तरुणम भाड्याने घेतलेल्या एका घोड्यावर स्वार होऊन, एका तालुक्याच्या सीमेवरून वहाणाऱ्या नदीकिनारी उतरले.