माझा बालमित्र | Majha Balmitra

विद्यालयीन जीवनासाठी मराठी ऐवजी इंग्रजी पूर्णपणे अनैसर्गिक

कविता मोरवणकर

मानकर काका(संपादक टॉनिक)

‘मराठी असे आमुची मायबोली’ असे आभिमानाने सांगणारा महाराष्ट्र आज पाश्चात्य भाषेने व्यापून गेला आहे. संतांनी सांगितलेली मराठी भाषेची महंती काळाच्या ओघात लोप तर पावणार नाही ना अशी किचिंत भीती मराठी माणसाच्या मनाला ग्रासत आहे.

खरं पाहता, मूल जेव्हा जन्माला येत तेव्हा प्रथमच त्याच्या कानावर श्रुत संस्कार होतात ते त्याच्या आईच्या मुखातील भाषेचे. मग ती भाषा कोणतीही असो. तो त्या भाषेशी एकरुप होऊन जातो. महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर ‘मराठीच बोली आमूची ! मराठीच बाणा! असे उद्‌गार आपल्य तोंडून नकळत निघत होते. पूर्वापार चालत आलेली ही अस्मिता आज तितकीशी दिसून येत नाही. याचं कारण म्हणजे इंग्रजी भाषेचा व्यवहारत झालेला शिरकाव. आज ती भाषा केवळ व्यवहारापुरतीच मर्यादित राहिली नाही तर तिने महाराष्ट्रातील घराघरात पाव्लं उमटवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.

इंग्रजी भाषेचा भारतात झालेला उगम विचारात घेतला तर असे दिसून येते की ब्रिटिश काळात पाश्चात्य शिक्षण भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी काही शाळा स्थापन केल्या. परंतु इंग्रज शासक याबाबतीत उदासीन होते. कंपनीचा कारभार इंग्रजी भाषेतून चालत असल्यामुळे इंग्रजी भाषा जाणणारा भारतीयाचा वर्ग तयार करणे इंग्रजांना निकडीचे वाटू लागले आणि म्हणूनच भारतियांना इंग्रजी माध्यमातून पाश्चात्य शिक्षण देण्याची नवी पद्धत त्यांनी सुरु केली. त्यातूनच भारतात इंग्रजी भाषा हळूहळू बाळसं धरु लागली. अशाप्रकारे व्यापारासाठी आलेले हे युरोपीयन भारताचे सत्ताधीश बनले आणि जाता-जाता भारतीयाच्या डोळ्यांवरील इंग्रजी भाषेचा पडदा दूर करण्यास मात्र विसरुन गेले. त्यापुढे जाऊन या भाषेचा वृक्ष अधिकच डवरत गेला. यावरुन असे दिसून येते की इंग्रजी भाषा प्राचीन काळापासून भारतात मूळ धरुन नाही तर ती अनैसर्गिकरित्या आपल्यावर लादली गेली आहे. तिच बीज इंग्रजांनी बनविण्यासाठी खतपाणी घातलं एवढंच.

हल्ली शिक्षण खात्याने इंग्रजी भाषा पहिलीपासूनच अभ्यासक्रमात अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. यामागे समाज परिवर्तनचा हेतू असल्याचेही कळते. या प्रस्तावाचे शाळंनी तसेच पालक वर्गानेही स्वागत केल्याचे दिसून येते. खरंतर, विज्ञान युगात टिकून राहण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण कोणतीही इमारत भक्कमपणे उभी राहण्यासाठी त्याचा पाया मजबूत असावा लागतो. त्याचवेळी कितीही वावटळं उठली तरी ती इमारत अगदी दिमाखात उभी राहू शकते. पण तरीही सामान्य मुलांचा विचार केला तर त्यांना या योजनेचा कितपत लाभ उठवता येईल याबाबत शंका आहे. सुखवस्तू घराण्यातील मुलं खाजगी शिकवण्यातून त्यावर माट करु शकतात. परंतु गरिबीत खितपत पडलेली मुलं या स्पर्धा युगात टिकणे कठीण आहे. आजूबाजूची परिस्थितीही त्याबाबतीत अनुकूल असेलच असे नाही.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेशी संबंध हा दिवसातील केवळ सहा तास असेल त्यानंतरच्या उरलेल्या वेळात त्यांच्या कानावर पडते ती परिसराची भाषा. तशीच परिस्थिती ग्रामीण भागातील मुलांची दिसून येते. दिवसभराचे व्यवहार ग्रामीण बोलीभाषेतून होत असताना ह्या मुलांना इंग्रजी भाषेची लहानपणापासूनच कितपत गोडी वाटेल, ते ही सांगता येणे कठीण आहे. त्यातच बहुसंख्य मुलांना मराठी भाषा नीटपणे लिहिता येत नाही. त्यात पहिलीपासूनच इंग्रजी भाषेचे डोस जर पाजले गेले तर एक दिवस अशी परिस्थिती निर्माण होईल की ही मुलं शिक्षणाविषयी उदासीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बौद्धिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीतही हाच प्रश्न उपस्थित राहतो. मग अशा मुलांच्या मनात न्युनगंडत्वाची भावना विकास पावण्याची तसेच या स्पर्था युगात आपण टिकू शकत नाही अशी मानसिकता निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. इतकेच काय तर, आधीच ग्रामीण भागात जाण्यासाठी शिक्षक वर्ग उदासीन असल्याने दिसून येते. त्यात जर का इंग्रजी शिकवण्याची क्षमताच एखाद्या शिक्षकात नसेल तर त्यांच्या अकुशलतेचाबळी विद्यार्थी ठरु शकतो.

आतापर्यंत समाजमन बदलविण्याचं मोलाचं कार्य मराठी वाडःमयांनी केल्याचे दिसून येतं. पण आज विज्ञानाने मानवीजीवनाची दिशाच बदलवून टाकली आहे. संगणकासारखा ज्ञानाचा खजिना म्हणजे भारतीयांना विज्ञानाने दिलेली देणच आहे. हा ज्ञानाचा खजिना भरभरुन लुटण्यासाठी इंग्रजी भाषा शिकणे प्रत्येकाला निकडीचे वाटू लागले आणि म्हणूनच बहुसंख्य पालक आपल्या पाल्याला मराठी माध्यमातून शिक्षण देण्याऐवजी इंग्रजी माध्यमात घालू लागले. पण पुढे हीच मुल इंग्रजी भाषेतून सुशिक्षित झाल्यावर उच्चपगाराने मोहित होऊन पाश्चात्य देशात पळ काढताना दिसून येतात. ज्या मातीमे त्यांना इंग्रजी भाषेचे डोस पाजले, तिचं माती आज त्यांच्यासाठी केवळ ‘जन्मभूमी’च राहिली आहे. जणु काही इंग्रजी भाषेने त्यांच्यातील मायभूमीविषयीची आत्मीयता हिरावून घेतलेली दिसून येते. ही आत्मीयता जोपसाण्यासाठी मराठी भाषेसारखं दुसरं साधन नसावं. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेबरोबरच माणसांमाणसातील नातेसंबंध पाश्चात्य संस्कृतीच्या धरतीव्र आधारलेले दिसून येतात. आज आई - बाबांची जाग ‘मम्मी - डॅडी’ या शब्दांनी घेतली आहे. ‘नमस्कार’ या अभिवादनाच्या शब्दाच्या जागी ‘हाय’ हा शब्द आला. आता अर्थ ‘नमस्कार’ होतो की ‘उंच’ हे ऐकणाऱ्यालाच समजवून घ्यावे लागते ही गोष्ट निराळी.

MarathiMati.com - Android App on Google Play Store


मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer