छोट्यांचे विनोद

प्रकाशक संपादक मंडळ | २८ डिसेंबर २००५

छोट्यांचे विनोद | Kids Jokes

छोट्यांचे विनोद - [Kids Jokes]

महेश : काल रात्री मी इतिहासाच्या पुस्तकावर दहा तास घालवले.
रमेश : काय, चक्क दहा तास ?
महेश : हो, रात्री पुस्तक उशीखाली घेऊनच झोपलो होतो.


एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासूनच हत्ती बसलेला असतो.
हत्ती : तू झाडावर काय करतोयस ?
गाढव : सफरचंद खायला आलोय.
हत्ती : अरे गाढवा, हे तर आंब्याचे झाड आहे.
गाढव : मी सफरचंद सोबत घेऊन आलोय.


नितेश : अरे सतीश, हे आंब्याचे झाड बोलू लागले तर काय मज्जा येईल ना !
मितेश : मजाच येईल ! कारण, ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल, की मी वडाचे झाड आहे.


सोन्या : बाबा, पक्याच्या वडिलांचा फोन होता.
ते म्हणाले, “तुम्ही माझा गृहपाठ लिहून पूर्ण केला की वही त्यांच्याकडे पाठवा !”


संता : मी दहा दिवस झोपलो नाही.
बंता : का बरं ?
संता : अभ्यासासाठी.
बंता : कसं काय जमलं तुला ?
संता : अरे, मी रात्री झोपायचो.

या विभागातील नवीन लेखन

चिकन बिर्याणी | Chicken Biryani

स्वीट कॉर्न सूप | Sweet Corn Soup

स्वीट कॉर्न सूप

विभाग पाककला

मटण हंडी | Mutton Handi

मटण हंडी

विभाग पाककला

मराठीमाती परिवाराचे सभासद व्हा


भारत सरकारच्या नवीन आयटी पॉलिसी नुसार कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्ती, समूदाय, धर्म तसेच देशाविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी दंडणीय गुन्हा आहे. अशा प्रकारच्या टिप्पणीवर कायदेशीर कारवाई (शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही) ची तरतूद देखील आहे. त्यामुळे या चर्चेत पाठविलेल्या कोणत्याही विचारांची जबाबदारी संपूर्णपणे लेखकाची असेल. मराठीमाती डॉट कॉम प्रताधिकार, गोपनीयता धोरण आणि वापराचे/वावराचे नियम.
comments powered by Disqus