तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 7

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

अकी या विषुववृत्तीय प्रदेशातील वृक्षांची त्याच्या चवदार फळांसाठी भरपूर लागवड केली जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

मिश्ना हा बायबल कालानंतरचा ज्यू कायद्याचा पहिला लिखित कोशा.तुम्हाला ठाऊक आहे काय?

बसेंजी हा आफ्रिकेतील न भूंकणारा कुत्रा भुंकण्याशिवाय इतर मात्र विविध आवाज काढू शकतो.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ऑस्कर वारनॅक याने पहिल्या व्यापारी उत्पादनास योग्य अशा अचूक छोट्या कॅमेऱ्याची रचना केली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

बारबूथ हा मध्यपूर्वेमध्ये प्रचालित फाशाच्या जुगाराचा एक प्रकार आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

बाकी हा ऑटोमन तुर्की भावकाव्याचा सम्राट, सुरुवातीला घोडेस्वारीमध्ये उमेदवारी करीत असे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ऑटिअर थिअरी म्हणजे चित्रपटाचा दिग्दर्शक हा पटकथाकारापेक्षा अधिक ‘लेखक’ असतो अशा प्रकारचा चित्रनिर्मिती क्षेत्रातील एक दावा.तुम्हाला ठाऊक आहे काय?

प्राईड अ‍ॅंड प्रेजुडीस या जेन ऑस्टेअन्च्या कादंबरीचे नाव आधी ‘फर्स्ट इम्प्रेशन’ असे होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅस्थेनिया या विकारात संपूर्ण शरीराला किंव एखाद्या अवयवाला अशक्तपणा येतो.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ऑरगेल्मी हे नॉर्वेच्या पुराणकथांमधील पहिल्या सजीवाचे, पाण्याच्या थेंबापासून उत्पन्न झालेल्या राक्षसाचे नाव.तुम्हाला ठाऊक आहे काय?