तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 6

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

अदाद हा बॅबिलॉनियन व असीरियन दैवतांमधील हवामानाचा देव होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅंब्लिओपिया म्हणजे हळूहळू किंवा एकाएकी येणारे. एका किंवा दोन्ही डोळ्यांना घासणारे दृष्टिमांद्य.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅडत टेम्मेनगॉंग म्हणजेमुस्लिम अमलापूर्वीच्या मलेशिया व इंडोनिशियामधील मूळ चालीरीती व प्रचलित हिंदू कायदा या दोहोंची संमिश्र परंपरा होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅडॅक्स हे सहारा प्रदेशात आढळणाऱ्या, झपाट्याने नष्ट होत चाललेल्या वाळवंटी सांबराच्या जातीचे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅडॅमसाईट या शिंका येणाऱ्या वायूचा शोध व वापर अमेरिकेने पहिल्या महायुद्धात केला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅडॅम्स ब्रिज हे श्रीलंका किनाऱ्यावरील मन्नार आणि भारतातील रामेश्वरम यांना जोडणाऱ्या खडकांच्या शृंखलेले नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अकाडेमगोरोडॉकहे दक्षिण मध्येरशियातील शास्त्रीय संशोधन केंद्राचे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

रॉय अ‍ॅकफ या अमेरिकेच्या गीतकार, गायक व व्हायोलिन वादकाला ग्रामीन संगीताचा राजा म्हणत असत.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आर्बोगास्ट या जंगली टोळ्यांच्या सेनापतीने, एका रोमन माणसाला नामांकित करून कळसूत्री सम्राट म्हणून प्रथम गादीवर बसविला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ट्वाय ही पश्चिम आफ्रिकेतील अकान जमातीची मातृभाषा आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?