तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 5

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

अल्माजेस्ट हा टॉलेमीने संकलित केलेला खगोलशास्त्रीय व गणितीय ज्ञानकोश आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅलिगेटर अ‍ॅपल हे उत्तम लाकडासाठी नावाजलेले विषुववृत्तीय अमेरिकेतील एक फळझाड आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हासिली आयव्हॅनोविच अल्क्सेयेव्ह या सोव्हिएट संघाच्या वेटलिफ्टरने १९७० ते १९७८ या कालखंडामध्ये ७९ जागतिक विक्रम प्रस्थापित केले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आल्बम म्हणजे प्राचीन रोममध्ये सार्वजनिक सूचना काळ्या रंगात लिहिण्यासाठी ठेवलेला पांढरा फलक.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आल्बियन हे ब्रिटन या बेटाचे सर्वात जुने उपलब्ध नाव होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अलेक्झांडर रोमान्स (लीला) हे नाव अलेक्झांडर द ग्रेट याच्या प्रचलित असलेल्या अनेकांपैकी कुठल्याही कथेला दिले जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

टेन्ली ऑल्ब्राईट ही जागतिक हौशी खेळाडूंच्या फिगर स्केटिंगमध्ये अजिंक्यपद मिळविणारी पहिली अमेरिकन महिला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

कोनराड अडेनायर हे जर्मन संघराज्याचे पहिले चॅन्सेलर होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अलान्टॉईस म्हणजे सरपटणारे प्राणी. पक्षी व सस्तन प्राणी यंच्या आतड्याच्या शेवटच्या टोकातून बाहेर येणारी अतिरिक्त गर्भत्वचा.तुम्हाला ठाऊक आहे काय?

विलियम अ‍ॅडॅम्स हे जपानला भेट देणारे पहिले इंग्रज.तुम्हाला ठाऊक आहे काय?