तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 4

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

अरबी मूळाक्षर पद्धती ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची उपयोगात आणली जाणारी लेखनपद्धती आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अली कॅटाडो’ म्हणजे बहुकोणीय रंगीत फरश्याची आकर्षक जुळवणी.तुम्हाला ठाऊक आहे काय?

फ्रान्सुआ अरागो या फ्रेंच पदार्थविज्ञान शास्त्रज्ञाने अचुंबकीय वाहकाच्या भिरभिरण्यातून उत्पन्न होणाऱ्या चुंबकत्वाचा शोध लावला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅमिगड्यूल म्हणजे अग्न्युत्पादक पाषाणांच्या आतील लांबट, गोल किंवा बदामाकृती पोकळीमध्ये आढळणारे खनिजांचे दुय्यम थर.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅंफिक्टियोंनी म्हणजे प्राचीन ग्रीसमधील कुठल्याही धर्मक्षेत्रांच्या सभोवतालच्या शेजारी राज्यांचा मित्रसंघ.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ऑलस्पाईस ही वेस्ट इंडीज आणि मध्य अमेरिकेमध्ये आढळणारी विषुववृत्तीय सदाहरित झाडाची जात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आल्टामिरा केव्हज ही स्पेनमधील गुंफा इतिहासपूर्वकालीन भव्यलेणी आणि भित्तीचित्रे यांसाठी प्रसिद्ध आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅमालेकाईट म्हणजे बायबलच्या जुन्या करारामध्ये ‘इम्राएलचे शत्रू’ म्हणून वर्णिलेल्या प्राचीन भटक्या जमाती पैकी माणूस.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅलोडियम म्हणजे कोणत्याही वरिष्ठाच्या मेहरबानीशिवाय स्वतंत्रपणे ताब्यात असलेली जमीन.तुम्हाला ठाऊक आहे काय?

निकोलस (फ्रान्सुआ) अ‍ॅपर्टा या फ्रेंच माणसाने अन्न हवाबंद डब्यांबध्ये बंद ठेवून अन्न टिकविण्याच्या पद्धतीचा शोध लावला.तुम्हाला ठाऊक आहे काय?