तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 2

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

‘अलोड्गपाया’ हेम्यानमारचे (ब्रह्मदेशाचे) शेवटचे शासक राजघराणे होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सर जॉन विलियम आल्कॉक यांनी, ब्रिटिश वैमानिक आर्थर ब्राऊन यांच्या सोबतीने अटलांटिक महासागर एका दमात पार करणारे उड्डाण सर्वप्रथम करण्याचा विक्रम केला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अनॅक्सागोरस या ग्रीक तत्त्वज्ञाने ग्रहणामागचे खरे कारण प्रथम शोधून काढले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅनक्सिमांडर या ग्रीक तत्त्ववेत्त्याला खगोलशास्त्राचा संस्थापक मानतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘उर्सुलाईन ऑर्डर’ हे रोमन कॅथालिक चर्चच्यामहिला पथकांतील (ऑर्डर) सर्वात जुने असून ते शिक्षणकार्याला वाहिलेली आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘आईल ऑफ अ‍ॅंग्लेसी’ हे इंग्लंडचे सर्वात मोठे बेट होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅनिमिझम’ म्हणजे मानवीव्यवहारांमध्ये रस घेऊन त्यात बदल घडवून आणू शकणाऱ्या अतिमानवी / आध्यात्मिक शक्तीवरील विश्वास होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅंटी-अ‍ॅटलास’ ही मोरोक्कोमधील एक पर्वतराजी आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅटोफॅगास्टा’ हा चिलीमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा भूप्रदेश आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आफ्रिकेतील एका रानटी मेंढीच्या जातीचे ‘औदाद’ हे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

प्राचीन अथेन्समधील पहिल्या ‘सरदार सभेचे’ नाव ‘अ‍ॅरिओपॅगस’ हे होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?