तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 18

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

बेन्झीन हे सर्वात प्राथमिक सुवासिक हायड्रोकार्बन मायकेल फॅरेड याने इ.स. १८२५ मध्ये शोधून काढले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

बीव्हर या पाण्यातील घुशीच्या जातीमध्ये कस्तुरीग्रंथी असतात. त्यातून क~स्टोरियम हा द्रव स्त्रवतो. तो सुंगधी अत्तरांमध्ये वापरतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अफार हे आफ्रिकेच्या ‘हॉर्न’ मधील रहिवाश्यांचे नाव.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हाईट व्हेल हा मासा जन्मतः निळ्सर राखाडी असतो किंवा काळपट असतो. तीन-चार वर्षात त्याचा रंग फिका होत शेवटी पांढरा होतो.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅफेनकापेल वेअर म्हणजे इ.स. १७४७ मधील सॅक्सनी येथील ड्रेस्डेन कोर्ट ऑर्केस्ट्राविषयीचे विडंबनात्मक आकार.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅफेनपिश्चर ही सतराव्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या शोभेच्या कुत्र्याची एक जात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आर्जेटाईन ही अटलांटिक व पॅसिफिक महासागरांच्या खोल पाण्यामध्ये सापडणारी माशांची जात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अहमदू अहिदजो हे कॅमेरूनचे पहिले अध्यक्ष, आधी रेडिओसंचालक होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हौदिनी हा आश्चर्यकारक जादूचे प्रयोग करणारा अमेरिकन जादूगाअ एरिक वीझ या रब्बीचा (ज्यू धर्मगुरु) पुत्र आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅलेश ही आल्प्स पर्वतातील सर्वात लांब हिमनदी.तुम्हाला ठाऊक आहे काय?