तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 15

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

वैदिक मंत्रघोषाची सुरुवात किमान ३००० वर्षापूर्वी झाली. बहुदा ही जगातली पहिली सलग गायन परंपरा होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

वेदुता या इटालियन शब्दाचा अर्थ आहे बघणे किंवा दृश्य हे नाव बहुदा अत्यंत बारकाईने वास्तववादी शैलीत रंगविलेल्या किंवा कोरलेल्या शहर गाव किंवा प्रदेशाच्या चित्राला उद्देशून वापरले जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हॉयेजर हे इंधन घेण्यापुरतेही न थांबता इ.स. १९८६ मध्ये जगप्रदक्षिणा करणारे पहिले अमेरिकन विमान होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

१९३८ मध्ये फ्रेडरिक विल्हेम याने ज्याचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजल (साधारणपणे ११ प्रकाशवर्ष) असा ६१ सिग्नी हा पहिला तारा आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

पहिला स्वाभविक दृश्याचा त्रिमिती चित्रपट म्हणजे इ.स. १९५२ मधील ‘ब्वाना डेव्हिल’ हा होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काळाच्या प्रारंभापासून झालेल्या घटना, कृत्ये, कल्पना आणि भावना यांच्या ‘स्मृती’ ची गूढशास्त्रातील चित्ररूपी नोंद.तुम्हाला ठाऊक आहे काय?

पाम-नट नावाचे पश्चिम व मध्य आफ्रिकेतील गिधाड मुख्यत्वे शाकाहारी असते पन क्वचित मेलेले मासे किंवा कवचयुक्त प्राणीसुद्धा खाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘वा’ हे पूर्व म्यानमार (ब्रह्मदेश) व नैऋत्य चीनच्या युन्नान प्रांतातील डोंगरात राहणाऱ्या लोकांचे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

होनस वॅग्नर या अमेरिकेच्या बेसबॉलपटूला ‘बेसबॉल हॉल ऑफ फेम’ (गौरव ग्रंथ) साठी निवडलेल्या पहिल्या पाच श्रेष्ठांमध्ये स्थान मिळाले आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

वॅगन हे एक जपानी तंतूवाद्य आहे. त्याला सहा तारा व हलवता येणारे पडदे असतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?