तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 14

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

एअर कुशन मशीन हे हॉवरक्राफ्टचे दुसरे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आल्बिनो घोड्यांचे डोळे निळे असतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

चान्स म्यूझिक या विसाव्या शतकांतील संगीतप्रकारामध्ये सादरकर्त्याला स्वतःच्याच क्ल्पनेने भरण्यांसाठी अनपेक्षित व अनिश्चित भाग सोडलेले असतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अलेनु हा युरोपीय मध्ययुगापासून म्हटल्या जात असलेल्य अत्यंत जुन्या ज्यू प्रार्थनेचा प्रारंभीचा शब्द आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अलेवाईफ’ हे एका महत्त्वाच्या उत्तर अमेरिकन हेरीगचे (माशाचे) दुसरे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

उव्हारोव्हाईट गार्नेट हा लहान, चमकदार हिरवा स्फटिकच्य रूपात मिळणारा अतिशय दुर्मिळ माणिक आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

उझी सबमशीनगन उझिएल गाल या इस्त्राएली सेना अंमलदाराने इ.स. १८९४८ मध्ये विकसित केल्यामुळे त्याचेच नाव बंदुकीला देण्यात आले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हूडलबग हे जर्मन व्ही १ क्षेपणास्त्राचे दुसरे नाव. हे क्षेपणास्त्र आजच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा पूर्व अवतार होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

व्हेरिओलेशन हा देवीची लस टोचण्याचा प्रकार होता. यात सौम्य रूपात देवी आलेल्या रोग्यांच्या लहानशा फोडची लागन दुसऱ्या रोग्याला केली जात असे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

वेचेका हे सर्वात पहिले सोव्हिएट राजकीय दक्षता पोलिश खाते आणि केजीबीचा आदिम अवतार होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?