तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 11

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

ट्रंपेटर हे लांब पायाच्या, गोल शरीराच्या ट्रंपेट बर्डंचे दुसरे नाव.तुम्हाला ठाऊक आहे काय?

चिनी हान घराण्याविरुद्धच्या व्हिएतनामच्या पहिल्या स्वातंत्र्याचळवळीचे नेतृत्व ट्रुंग भगिनींनी म्हणजेच दोन स्त्रियांनी केले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘टूथ ऑर कॉन्सिक्वेन्सेस’ हे न्यू मेक्सिकोच्या (अमेरिका) नैऋत्य भागातील एका शहराचे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

त्सा-इ-लुन या चीनमधील न्यायालय अधिकाऱ्याकडे कागदाच्या संशोधनाचे श्रेय जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

प्रलयंकारी लाटांना नेहमीच्या भरती-ओहोटीशी संबंध नसतो. बहुतेकदा समुद्रळातील भूकंपामुळे त्या निर्माण होतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘त्सुशिमा’ ची लढाई (मे १९०५) जपान-रशिया युद्धामध्ये रशियन आरमारच्या अखेरच्या पराभवास कारणीभूत झाली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

त्सुझुमी हा वाळूच्या घड्याळाच्या आकाराचा दुतोंडी जपानी मृदंग आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

टू फू या चिनी कवीला सर्वकालीन श्रेष्ठ कवी म्हणून समीक्षकांनी मान्यता दिली आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

फ्लूटमाऊथ हे ट्र्म्पेट फिश (मासा) चे दुसरे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

उत्तर आफ्रिकेतील तुआरेग आदिवासी पुरुष आपल्या सासुरवाडची मंडळी, कुणी परके लोक किंवा स्त्रिया यांच्यासमोर निळा बुरखा घालतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?