NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

२७ मार्च दिनविशेष

March 27

केशवसुत
केशवसुत
जागतिक दिवस
 • जागतिक रंगभूमी दिवस
ठळक घटना
 • १६६७ : शिवाजी महाराजांची साथ सोडून मोगलांना जाऊन मिळालेले नेताजी पालकर यांचे सक्तीने धर्मांतर केले गेले.
 • १८९३ : केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली.
 • १९९२ : ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
 • २००० : चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
 • २००१ : लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.
 • २००४ : नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.
जन्म
 • -
मृत्यू
 • १८९८ : सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.
 • १९६८ : युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.
 • १९९२ : प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय.
 • १९९७ : भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता.

Book Home in Konkan