केदार कुबडे

केदार कुबडे | Kedar Kubade

केदार कुबडे - [Kedar Kubade] कला आणि साहित्य क्षेत्राची आवड आणि ध्यास असणार्‍या केदार कुबडे यांचे पदवी शिक्षण शास्त्र शाखेतुन झालेले आहे. शालेय दिवसांत नाटके, गायनस्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत पठणस्पर्धा इत्यादी मधील उस्फुर्त सहभागामुळे केदार यांची मराठी भाषेवरील पकड मजबुत झाली. पुढे महाविद्यालयीन काळात व्यक्तिमत्व स्पर्धा व गायन स्पर्धांमध्ये त्यांच्यातील कला गुणांचे नाणे खणखणीत वाजले. प्रेमावरील हळुवार तरल चारोळ्यांमुळे त्यांच्यातील हळवा कवी चारोळी स्पर्धा देखील गाजवुन गेला. कला आणि साहित्य क्षेत्राव्यतिरिक्त केदार यांना रेकी, हिप्नॉटिझम, ज्योतिष शास्त्र, संख्याशास्त्र, योग विद्या आणि ध्यान साधना या विषयांत देखील रूची आहे. आपल्या अनुभवांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांनी लिहीलेल्या भयकथा तर वाचक वर्गाच्या अंगावर काटा ऊभा करतात. हार्मोनी प्लस व रानजाई या ओर्केस्ट्रांद्वारे त्यांनी व्यावसायीक गायक म्हणुन स्टेज शोज देखील केले आहेत.

बायंगी - मराठी कथा | Bayangi - Marathi Katha

बायंगी

मराठी कथा

भरभराटीसाठी आणलेले बायंगी भुत मंदारला भरभरून देऊन गेले पण त्याच्या एका मागणीने मंदारचे सर्वस्व लुटून नेले. यशाचा शॉर्टकट मंदारला कसा महागात पडला याची ही कथा.

अधिक वाचा

शाळा - मराठी कथा | Shala - Marathi Katha

शाळा

मराठी कथा

माझा एक अनुभव शेयर करतोय. जे काही मी पहिले ते भुत होते की दुसरे काही हे मला माहीत नाही पण अनुभव नक्कीच अंगावर काटा आणणारा होता.
मी मुळचा रत्नागिरीचा पण नोकरी निमित्त गेली १२ वर्षे पुण्यात राहतो. २००० साली मी गोगटे-जोगळेकर कॉलेजला सायन्सच्या शेवटच्या वर्षाला होतो. तेव्हाचा हा एक अनुभव.

अधिक वाचा

चकवा - मराठी कथा | Chakwa - Marathi Katha

चकवा

मराठी कथा

माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात. असेच दुर्लक्ष शरद आणि हिरवे कुटुंबियांच्या जीवावर कसे बेतले याचीच कथा म्हणजे चकवा...

अधिक वाचा

लॉंग ड्राईव्ह - मराठी कथा | Long Drive - Marathi Katha

लॉंग ड्राईव्ह

मराठी कथा

बऱ्याच लोकांना रात्री लॉंग ड्राईव्ह वर जायची हौस असते. खुप रोमॅंटिक वाटते म्हणे. अशीच एक पौर्णिमेच्या रात्री केलेली लॉंग ड्राइव जय आणि सरिताच्या अशी काही अंगाशी आली की ती रोमॅंटिक न ठरता कशी जीवघेणी ठरली याची ही कहाणी.

अधिक वाचा

वेडेपणा | Vedepana

वेडेपणा

मराठी चारोळी

त्या रात्री दीड वाजता
या चारोळ्या मी केल्या

अधिक वाचा