केदार कुबडे

केदार कुबडे | Kedar Kubade

नाव: केदार कुबडे
जन्म दिनांक: १३ एप्रिल
अल्प परिचय: कला आणि साहित्य क्षेत्राची आवड आणि ध्यास असणार्‍या केदार कुबडे यांचे पदवी शिक्षण शास्त्र शाखेतुन झालेले आहे. शालेय दिवसांत नाटके, गायनस्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत पठणस्पर्धा इत्यादी मधील उस्फुर्त सहभागामुळे केदार यांची मराठी भाषेवरील पकड मजबुत झाली. पुढे महाविद्यालयीन काळात व्यक्तिमत्व स्पर्धा व गायन स्पर्धांमध्ये त्यांच्यातील कला गुणांचे नाणे खणखणीत वाजले. प्रेमावरील हळुवार तरल चारोळ्यांमुळे त्यांच्यातील हळवा कवी चारोळी स्पर्धा देखील गाजवुन गेला. कला आणि साहित्य क्षेत्राव्यतिरिक्त केदार यांना रेकी, हिप्नॉटिझम, ज्योतिष शास्त्र, संख्याशास्त्र, योग विद्या आणि ध्यान साधना या विषयांत देखील रूची आहे. आपल्या अनुभवांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांनी लिहीलेल्या भयकथा तर वाचक वर्गाच्या अंगावर काटा ऊभा करतात. हार्मोनी प्लस व रानजाई या ओर्केस्ट्रांद्वारे त्यांनी व्यावसायीक गायक म्हणुन स्टेज शोज देखील केले आहेत.

करणी - मराठी कथा | Karni - Marathi Katha

करणी

मराठी कथा

रामराव पाटलांसारख्या देव माणसाच्या मुलावर केलेल्या करणीमुळे त्याची झालेली भयानक अवस्था आणि मृत्युच्या दाढेतुन रामरावांनी त्याची केलेली सुटका याची रोमांचक कहाणी म्हणजेच करणी...

अधिक वाचा

सर्वपित्री अमावस्या - मराठी कथा | Sarvapitri Amavasya - Marathi Katha

सर्वपित्री अमावस्या

मराठी कथा

असे म्हटले जाते की सर्वपित्री अमावस्येला अपवित्र जागी तसेच पाणवठ्या जवळ जाऊ नये. अशाच एका सर्वपित्री अमावस्येला झपाटलेल्या संजयची ही कहाणी...

अधिक वाचा

समंध - मराठी कथा | Samandh - Marathi Katha

समंध

मराठी कथा

हिंदु मुस्लिम पार्श्वभुमीवर फुललेल्या सचिन आणि शहनाज यांच्या प्रेमाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी एका अमानवीय शक्तिशी घेतलेली टक्कर याची कथा म्हणजेच समंध...

अधिक वाचा

मानकाप्या - मराठी कथा | Maankapya - Marathi Katha

मानकाप्या

मराठी कथा

काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अनुभव घेतलेल्या बाबा कोळेकरांनी मृत्युला दिलेल्या गुंगाऱ्याची खिळवून ठेवणारी कथा म्हणजेच मानकाप्या...

अधिक वाचा

बायंगी - मराठी कथा | Bayangi - Marathi Katha

बायंगी

मराठी कथा

भरभराटीसाठी आणलेले बायंगी भुत मंदारला भरभरून देऊन गेले पण त्याच्या एका मागणीने मंदारचे सर्वस्व लुटून नेले. यशाचा शॉर्टकट मंदारला कसा महागात पडला याची ही कथा...

अधिक वाचा