MarathiMati.com
मराठी लेख | Marathi Articles | Marathi Lekh

मराठीचा मौजा

- सौ. उज्वला पिंपळखरे

संदीपचा अमेरीकेत कायम रहाणारा चंदूमामा पुण्याला त्याच्या बहिणीकडे मीनाताईकडे महिन्याच्या रजेत रहायला आला होता. चार वर्षाच्या संदीपला त्याचा चंदूमामा म्हणजे एक कोडे वाटले होते. त्याचे कपडे, त्याचे वागणे विशेष म्हणजे बोलणे याचे फार नवल वाटायचे संदीपच्या वडिलांच्य तीन खोल्यांच्य जागेत चंदूमामाच्या सूटकेसमधले त्याचे कपडे, आकर्षक वस्तू, बूट-मोजे पुढल्या खोलीत पसरलेले असायचे. तिथल्या दिवाणावर चंदूमामा सकाळी आठ वाजता कामवाली मोलकरीण येईपर्यंत जोपून राही. ती कामाला आली की, चंदूमामाला त्याची पांघरायची चादर, उश्या गोळा करुन ‘ओ झिजस्‌’ असे पुटपुटत दात घासायला उठावे लागे. मग चहा पिऊन झाल्यावर तो परत ‘ओ झिजस्‌’ असे मनाशी म्हणत स्नानासाठी मोरीत जाई.

 

स्नान झाल्यानंतर मीनाताई त्याना विचारीत असे, ‘ अरे चंदू, तुझ्यासाठी आज काय करु? उकडीचे मोदक का पुरणपोळ्या!’
‘ओ झिनस’ चंदूमामा उत्तर देई. "मीनाताई, मला ना अमेरिकेत राहून आपल्या खाद्यपदार्थांची आवडनिवड पार नाहिशी झालीय! तुला काय बनवायाचंय्‌ ते तुझ्य पसंतीन ठरवून करीत जा. मल विचारू नकोस!’ ‘ओ झिनस्‌’ संदीपने चंदूमामाच्या त्या ‘ओ झिजस्‌’ची नक्कल करीत म्हटले.

 

चंदूमामा स्नान केल्यावर कपडे करुन झाल्यावर बहिणिला म्हणाला "मीनाताई, मी जरा बाहेर जाऊन तासाभरांन घरी येतो हं. माझे हे टीशर्ट, पॅन्ट धुवायचेत. तुझ्याकडची डिबिकें कधी कामाला येईल? अजून आली नाही ना? अच्छा! आलीय पण तू कुठला वाणीसामान आणायला पाठवलंस का? ठीक! माझे कपडे मी आल्यावर धुवून टाकीन. अच्छा! जाऊन येतो," असे म्हणत चंदूमामा बाहेर पडला तो गेल्यावर संदीपने त्याच्या आईला प्रश्न केला, "आई, चंदूमामा सारखं सारखं बोलताना ‘ओ झिजस्‌, ओ झिजस्‌’ का म्हणतो ग?"

त्याच्या या प्रश्नावर मीनाताई हसून म्हणाली "अर, चंदूमामा ना परदेशात रहातो ना? तिकड सगळीजन इंग्रजीत बोलतात. त्या लोकांना आपल्यासारख ‘अरे देवा, अरे राम’ अस बोलता येत नाही. त्याचा देव झिजस्‌ म्हणून ते तस म्हणतात. चंदू त्यांच्यात राहिल्यामुळ तोही ‘ओ झिजस्‌’ म्हणतो बर का!"
संदीप मामाची नक्कल करीत म्हणाला ‘ओ झिजस्‌’ "हं संदीप, तू तसं म्हणू नकोस हं! " त्याच्या आईने त्याला दटावून म्हटले. ‘तसचं आई, मघाशी मामाने बोलताना तुझ्याकडची डिबिकें कधी कामाला येईल असं का विचारल?’ संदीपने दुसरा प्रश्न विचारला. मीना खळखळून हसली, "अरे डिबिकें म्हणजे धुणंभांडी कचरा हीकाम करणारी आपली शेवंती मोलकरीण." ‘मामा तिला शेंवती असं नावानं का म्हणत नाही?’ संदीपने विचारले. "ते कळु दयायचं नाही ना तिला! म्हणुन डिबिकें या नावानं अर्थ तर कळतो पण कोणाला ओळखता तर येत नाही." मीनाने त्याला समजावून सांगितले. दुपारच्या जेवणानंतर मीनाताई जरा झोपली होती. घरात चंदूमामा मासिक चाळीत असताना त्याच्याजवळच संदीप खुर्चीत बसून त्याला विचारीत होता, ‘अरे मामा, तुला एक कोड घालू? बरोबर ओळखशील राममून पांडूकलर डुडायडू म्हणजे काय? ओळक!’ "संदीप तुझी भाषा फार कठीण आहे रे. समजून हा शब्द तर मला फारच कठीन आहे रे. मी हे शिकलो नाही कुठं! आता मि तुला एक कोड विचारु? नकादुचेण्यापका सके याचा अर्थ सांग?" संदीपला हे ऐकून काही सांगता येईना, तो "हरलो" म्हणाला. चंदूमामाला दुसरे कोडे आठवून तो म्हणाला, "शंकरास पूजिले सुमनाने म्हणजे काय?"

तेवढ्यात शेजारची सुबोध (मुलीचे नाव) मीनाताईला विचारु लागली, "मावशी मला वर्गात निबंध लिहायचा आहे. पाच विषय दिलेत, त्यातला एक निवडायचा आणि निबंध लिहायवाय.’ आठवीतली सुबोध विचारीत होती. चंदूमामाने संदीपला विचारलेले कोडे परत सुबोधलाही विचारल्यावर ती लगेच म्हणाली, "मामा, शंकरास पूजिले सुमनाने ना? मी सांगते सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने. सुमनचा दुसरा अर्थ म्हणजे मुलीच नाव. तिसर म्हणजे फुल बरोबर की नाही?’ ‘शाब्बास हं सुबोध’ मीनाताई हसून म्हणाली, ‘आता मी विचारते!’ मीनाताई म्हणाली "रामरामराम राम राम राम हे जलद म्हणून दाखवा हं सुबोध, तू म्हण बरं"

सुबोधने सुरुवात केली ‘रामरामराम राम राम राम’ असे जोरात म्हणताना शेवटी कानावर येऊ लागले, मरामरा मरा मरा! सर्वांना गमत वाटून ते हसू लागले.

 

"आणखी एक गमत सांगते हं. रामाला भाला मारा हे वाक्य आहे ना? त्याचे उलट शब्द केले तर काय होईल ते पहा" मीनाताईने सांगितले. सुबोध प्रयत्न करु लागली, "रामाला भाला मारा’ तिने सांगितल्यावर सर्व हसू लागले. संदीपचा फळा भिंतीवरच लटकलेला होता. त्याने खडूने लिहून काढले खालची ओळ चंदूमामाने खालची "रामाला भाला मारा"

 

मीनाताईने संदीप आणि सुबोध यांना सांगितले ,"मुलांनो आपली मराठी भाषा किती समृद्ध अहे याची थोडी कल्पना येईल. आता यापुढे आपण रोज नवे दहा मराठी शब्द शिकायचा प्रयत्न करायचा! रोज संध्याकाळी मी तुम्हाला विचारीत जाईन. कोणते दहा मराठी शब्द शिकलात ते सांगा? असं करुनच तुमची शब्दसंपत्ती वाढत जाईल.

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer