Aksharmanch

रेशमीचे बंध

सं.गु पाटील

रेशमीचे बंध, मी छाटून आले

वेदनेची लाट, मी आटून आले

भोगले जे दु:ख, त्याला सोबतीने

वंचनेची साथ, मी थाटून आले

रात सोसूनी, फुलांच्या चिंब नेत्री

त्या दवाचे थेंब, मी चाटून आले

संपली रात्र, सखा आला तरूनी

कापराचे प्रेम, मी वाटून आले

ही तुझी, साधी कहानी ठीक आहे

माझीया डोळ्यात, मी दाटून आले

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.