वटपौर्णिमा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ नोव्हेंबर २०११

वटपौर्णिमा - मराठी कविता | Vat Pournima - Marathi Kavita

अनादी काला पासून उभा आहे मी.
ह्या जमिनीत घट्ट पाय रोवून
सावित्रीनी परत मिळवले पतिप्राण
तेंव्हा पासून.

तेंव्हा पासून हे व्रत सांभाळतोय.
वटपौर्णिमेच्या पूजेला पावतोय
तोडून देतोय घरोघरी पूजे साठी
फांद्या स्वतःच्या.

पण बायांनो, खूप म्हातारा झालोय आता.
एक कराल? ह्या वेळी पूजा करताना
माझ्या साठीहि मागाल जीवदान
यमराजा कडे?

का असं कराल? खूप थकलोय उभा राहून.
वादळाला सांगाल? मला उन्मळून पडायला
जमिनीला पाठ टेकीन म्हणतोय
चिरनिद्रा घ्यायला.