Download MarathiMati.com's New Android App from Google Play

वस्तू वास्तू नाती

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ नोव्हेंबर २०११

वस्तू वास्तू नाती - मराठी कविता | Vastu Vaastu Nati - Marathi Kavita

वस्तू
जुन्या होतात..
असून अडचण
नसून खोळंबा होतात
भिगडल्या तरी
रिपेअर करता येतात
जुन्या झाल्या तर टाकून देता येतात.

वास्तू
जुन्या होतात..
असून अडचण
नसून खोळंबा होतात
रिपेअर केल्या तरी
त्रास देतात
नवीन घ्यायच्या तर
महाग पडतात.

नाती
जुनी होतात..
असून अडचण
नसून खोळंबा होतात
तोडता येत नाहीत म्हणून
टिकून रहातात
भिगडत जातात तरी ओढत रहावी लागतात.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play