Download MarathiMati.com's New Android App from Google Play

वास्तवाचे ठिपके

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ सप्टेंबर २००८

वास्तवाचे ठिपके - मराठी कविता | Vastavache Thipake - Marathi Kavita

वास्तवाचे ठिपके स्वपनांच्या रेखानी जोडत
कल्पनेच्या विश्वातले रंग मनमुराद भरत
चितारली रांगोळी मनीच्या अंगणात
रांगोळी काढता काढता रमले भावविश्वात
ठिपक्यांच्या जागी मनी चांदणे उमलले
आकाशीच्या चंद्रानंही अंतरात डोकावले
सुरू झाला लपाछपीचा खेळ...
वास्तवाचे ठिपके नी कल्पनेच्या चांदण्या
स्वप्नांच्या रेखावर धावू लागल्या
रेखा पुसट झाल्या...
पण...
त्याच भान ना ठिपक्यांना, ना चांदण्यांना
विस्कटल्या रांगोळी बरोबर मनही विस्कटले
त्याला जाणवत होते फक्त वास्तवाचे ठिपके.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play