वनवास

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २०१८

वनवास - मराठी कविता | Vanavas - Marathi Kavita

बाराव्या वर्षी आपला दिवटा
धावत असतो सिनेमाला
गप्पा असतात हीरो च्या
अन किंमत नाही कष्टाला

नसतं कुठलं समोर स्वप्न
अन गगन भरारी चं ध्येयं
त्याला गुटख्याच व्यसन
अन स्वप्नात दारुचच पेय

बोलतो किती उद्धट पणे
जगणे बघा ताठर पणे
सारेच त्याच्या समोर फिके
जगच भासते त्याला उणे

याच वयात बघा

एक कोवळा बालक
लाडकं घर सोडतो
श्रीरामांच्या शोधार्थ
तपश्चर्या करतो

नसेल आली का त्याला आठवण
आईच्या चौघाडी ची
काय होते त्याला कमी
चिंता वाहिली विश्वाची

अखंड विरोध साहून त्याने
स्त्री ला केले कीर्तनकार
दासबोध लिहून केला
श्रीरामांचा जयजयकार

आपलं लेकरू या वयात
करेल का हो विचार?
त्याला सुधारन्यात जाते आयुष्य
त्याच्या चिंतनात असते का भविष्य

सांगा खरंच करतो का तो
तपश्चर्या अभ्यासाची
आहे जिद्द जिंकण्याची
अन काळजी उद्याची

म्हणून च वाटतं
करू नये निंदा
कोणत्याही साधुसंता ची
सोडू नयेत वागबाण... कठोर वचनांची

खंत मात्र एकच वाटते

चौदा वर्षात वनवास
संपला श्रीरामांचा
पण आज ही वनवास
संपला नाही रामदासांचा

  • TAG