MarathiMati.com - Android App on Google Play Store

वडपूजा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ सप्टेंबर २००८

वडपूजा - मराठी कविता | Vadpuja - Marathi Kavita

जन्मोजन्मीच्या सौभाग्याच्या
अपेक्षेने गुंडाळलेल्या
दोऱ्यांचा वेटोळा
स्रीत्वाचा ठरलाय
डोलारा मोकळा
करून तारुण्याचा लोळागाळा
स्वप्नांचा केलाय पालापाचोळा
जरी पदर चुरगळला
तरी प्रत्येक स्त्री
साजरा करतेय
वडाला पूजण्याचा
दोरा गुंडाळण्याचा
आणि जन्मोजन्मी
सत्यवान मागणीचा
समारंभ सोहळा

MarathiMati.com - Android App on Google Play Store