वादळ झेलताना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ सप्टेंबर २००८

वादळ झेलताना - मराठी कविता | Vadal Jheltana - Marathi Kavita

वादळानं त्रस्त झालेला
तहानलेला तो किनार
आशाळभूत पणे
सागराकडं पहात होता
त्याला वाटत होतं
आपल्यालाही त्या लाटांची
सामावून घ्यावं...
तहानलेल्या मनाला
तृप्त करावं...!
आपल्याच मस्तीस बेभान
झालेलं ते पाणी...
किनाऱ्याकडं न येता
उंच उंच लाटात
बुडून गेलं होत...!
तो किनारा...
तसाच कोरडा
वादळ झेलत उभा असताना
नागमोडी वळणं घेत
ती सरिता आली
सागराच्या किनाऱ्याला
तृप्त करूनच,
सागरात सामावली
सागराच्या खारट पाण्यापेक्षा
सरितेच्या अमृत जलाने
न्हाऊन निघालेला किनारा
तृप्त झाला!