पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

उषःकाल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ फेब्रुवारी २०१७

उषःकाल - मराठी कविता | Ushakal - Marathi Kavita

उषःकाल झाला मनाच्या अंगणी
उगवला भास्कर पूर्व दिशी
किरणांचे सांडले सडे
प्रकाशाच्या उधळल्या

सडा समार्जन झाले दारी
सजली मोहक रांगोळी
पाखरांची झाली चाहूल
देऊळी नांदल्या भूपाळी

वार्‍याचा मोहक इशारा
अंगाला शहारून गेला
फुलांच्या धुंद सुवासांनी
परिसर सारा बहरुनी आला

गाय हंबरली गोठ्यात
बिलगण्या तिच्या वासरा
मायेनी तयास समीप घेता
सांडू लागल्या दुग्ध धारा

पाखरे निघाली रानोवनी
पिलास शोधण्या चारा
धरती सरसावली पुढे
लागल्या वाहू प्रयत्नांच्या धारा

Book Home in Konkan