उंच घ्यावी भरारी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जानेवारी २०१८

उंच घ्यावी भरारी - मराठी कविता | Unch Ghyavi Bharari - Marathi Kavita

वाटे मनास माझ्या
उंच घ्यावी भरारी
निळ्याभोर गगनात
स्पर्शुन यावे तरी

निळ्या आकाशाला
जवळून पहावे
आणि त्या अंगणात
मीही लपून जावे

शोधशील का तू
मला तेथे येऊनी
तू दिसता क्षणी
येईल मी धावूनी

  • TAG